सांगोला – कोळे (ता.सांगोला) येथे कोळेकर महास्वामीजी ३० वे पिठाधिपती यांच्या आशीर्वादाने व कोळेकर महास्वामीजी ३१ वे पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटक मधून हजारो भाविकांनी गुरुचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. प्रत्येकाने गुरुची सेवा करा यश प्राप्ती होईल असे कोळेकर महास्वामींनी आशीर्वाचनात सांगितले. याप्रसंगी महास्वामींची गावातून भव्य रथात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भजनी मंडळ, ढोल ताशा, वाजंत्री, गजी ढोल याचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोळेकर महास्वामींच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी सांगितले.