सोलापूर : मंद्रूप येथील विठाई नगर येथील हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा पार पडला. पहाटे राजकुमार अतार महाराज यांनी महाभिषेक करून पूजा केली. त्यानंतर विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यावर भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली .
हनुमान जयंतीनिमित्त सकाळी जन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. हनुमान जयंती पार पाडण्यासाठी राजकुमार अतार, संतोष तेली, राजु दळवी, गजानन सुतार, सलीम तांबोळी, सुभाष शिंदे आणि अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.
















