Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘दक्षिण’च्या बैठकीमध्ये नागरीकांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष

तरुण भारतbyतरुण भारत
April 3, 2026
in editor
0
‘दक्षिण’च्या बैठकीमध्ये नागरीकांच्या ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – तब्बल चार वर्षानंतर दक्षिण सोलापूर पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी सभापती संदिप टेळे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या समस्या व तक्रारीकडे दुर्लक्ष करीत अधिकाऱ्यांची मर्जी संभाळण्यासाठीच सदस्यांची बैठक झाल्याची चर्चा सुरू आहे.  पंचायत समितीची पहिलीच बैठक असल्यामुळे सर्व सदस्यांनी चार वर्षांच्या कामाचा व खर्चित निधीचा आढावा घेत नागरीकांच्या समस्येविषयी प्रशासनाला धारेवर धरणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. पहिल्याच बैठकीत अधिकार्‍यां विरोधात बोलू नका असा आदेश पक्षश्रेष्ठीकडून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सदस्यांनी पहिल्याच बैठकीत दक्षिण मधील नागरिकांच्या तक्रारी , अडचणी व समस्यांकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. त्यामुळे नूतन सदस्य अधिकाऱ्यांवर व प्रशासनावर वचक निर्माण करून शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविणार का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
      २०२२ नंतर तब्बल चार वर्षे पंचायत समितीवर प्रशासक राज्य होते. यावेळी अनेक गटविकास अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करीत नागरिकांच्या विकासाचे पैसे अन्यत्र वळविले आहेत. तसेच त्या निधीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. शिवाय लोकप्रतिनिधी नसल्यामुळे गटविकास अधिकार्‍यांनी नागरिकांच्या तक्रारी व अडचणींना केराची टोपली दाखवत त्याकडे दुर्लक्ष केला आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही गट विकास अधिकारी नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या मासिक बैठकीत नागरिकांच्या तक्रारीवर चर्चा होणे अपेक्षित असताना व अधिकाऱ्यांना धारेवर न धरता थातुरमातुर आढावा घेऊन  बैठक पार पडल्याची चर्चा सुरू आहे . या बैठकीतील अढावाविषयी सदस्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने सदस्यही गंभीर नसल्याचे दिसून येते.
   दक्षिण मध्ये घरकुलची अपूर्ण कामे , लाभार्थ्यांची बिल काढण्यासाठी वारंवार हेलपाटे,   नवीन विहिरी परवानगी प्रलंबित, विकास निधीच्या  बिलांसाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक, साहित्य वाटपातील भ्रष्टाचार, दक्षिणमधील शाळांची दुरावस्था व शिक्षकांची गैरहजेरी, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था तसेच गटविकास अधिकारी व  कर्मचार्‍यांचे कार्यालयातील गैरहजरी यासह इतर अनेक प्रश्नांवर मासिक बैठकीत चर्चा होणे अपेक्षित असताना ” अनुभवी व हुशार” सदस्यांकडूनही जाणिवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सदस्यांची पहिलीच बैठक “फुसका बार” ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.
सभापती संदीप टेळे यांनी यापूर्वी पंचायत समिती सदस्य व उपसभापती म्हणून काम केला असून त्यांच्याकडून प्रशासनाला धारेवर धरून नागरिकांच्या कामाला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त होती. मात्र प्रशासनाच्या आढावाशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय या बैठकीत झाल्याचे दिसून येत नाही . शिवाय मंद्रूप ग्रामसेवक बदली सह अनेक नियमबाह्य ठराव करण्याचाही प्रयत्न या बैठकीत झाल्याची चर्चा सुरू आहे . त्यामुळे मासिक बैठक म्हणजे केवळ उपस्थित सदस्य व अधिकार्‍यांची गप्पा ठरल्याचे बोलले जात आहे.
….
चौकट
….
सभापतीने धोरणात्मक निर्णयासाठी गटविकास अधिकारी व विविध विभाग प्रमुख यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवणे गरजेचे आहे. प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे . सीना-भीमा खोऱ्यासह मुस्ती — तांदूळवाडी परिसरातील नागरिक बीडीओंना भेटण्यासाठी कार्यालयात आले असताना बीडीओसह विभाग प्रमुखही भेटत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे वेळ व पैसा वाया जात आहे. यामुळे प्रशासनातील अधिकारी निगरगट बनले असून  लाभार्थ्यांचे आर्थिक हेळसांड होत आहे . म्हणून सभापती टेळे व सदस्य यांनी प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची  अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
….
  मंद्रूपच्या नागरीकांकडून ग्रामसेवक जोडमोटे यांच्याबद्दल अनेक तक्रारी करण्यात आली आहेत. नागरीकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून केवळ ग्रामपंचायतच्या पत्राची दखल घेण्यात आल्याने बीडीओ राऊत व सदस्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Post Views: 19
Previous Post

विठाई नगरात हनुमान जयंती उत्साहात

Next Post

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये विज्ञान अविष्कार प्रदर्शन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये विज्ञान अविष्कार प्रदर्शन

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये विज्ञान अविष्कार प्रदर्शन

ताज्या बातम्या

पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा – प्रशांत माने

May 25, 2026

हम कमिशनर है म्हणणाऱ्या रीलवाल्याचा पोलिसांनी उतरवला माज

May 24, 2026

आरक्षणावर सडेतोड बोलले ओबीसी नेते हाके

May 24, 2026

नाभिक समाजाच्या पुढाकारातून दोन गरीब दाम्पत्याच्या जुळल्या रेशीमगाठी

May 23, 2026

निकाळजेंच्या घरी सांत्वनासाठी पोहोचल्या खा प्रणिती शिंदे

May 23, 2026

श्री शक्ती सेवा समिती सोलापूरच्या वतीने ऐश्वर्या लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवात सुवासिनींने केले पूज

May 23, 2026

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

May 23, 2026

अप्रिय घटना नको, त्वरित पोलिसांना संपर्क साधा ईदसाठी सूचना

May 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0877780

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697