
सांगोला – महूद (ता.सांगोला) येथील शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने सेवानिवृत्त होणाऱ्या लक्ष्मीनगर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय महाजन, उपशिक्षक सुधाकर डांगे, बंडगरवाडी नं.१ शाळेचे शिक्षक पांडुरंग गोफणे, विठ्ठलवाडी शाळेचे उपशिक्षक संपत आसबे, महानवरवस्ती शाळेचे उपशिक्षक भास्कर महाजन, बाभुळगाव (ता.पंढरपूर) प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नष्टे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वंदना पाटणे, दऱ्याबा येडगे, सुरेश कुंभार, विठ्ठल तांबवे, धनंजय नरळे, नितीन कांबळे, रवींद्र पाटील, संजय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तानाजी खबाले, धनंजय महाजन, बाळासाहेब जाधव, संजय भोसले, मुकुंद देशमुख, दत्तात्रय बाड, संतोष पोतदार, उमेश महाजन, मुश्ताक जमादार, दत्तात्रय लवटे, पोपट खाडे, अभिमन्यू कुटे, संजय कांबळे, गणेश दीक्षित, सचिन सावंत, संतोष कांबळे, नवनाथ ऐवळे, संभाजी लवटे, बिराप्पा महारनवर, वसंत लवटे, महेश कांबळे, दुर्योधन जाधव, संजय बजबळकर, विजय शेंडे, विलास कांबळे, अशोक चव्हाण, भारत लवटे उपस्थित होते. आभार सत्यवान कारंडे यांनी मानले.
Post Views: 4