Wednesday, August 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत करमाळ्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

तरुण भारतbyतरुण भारत
August 12, 2026
in west maharashtra
0
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत करमाळ्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, उद्योजक आणि शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्वरित दूर कराव्यात, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज, करमाळा यांच्या वतीने महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला ‘जाहीर निवेदन’ देऊन विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत:
वाहन कर्जाची बंद ‘LOI’ पूर्ववत सुरू करा: वाहन कर्जासाठी बंद करण्यात आलेली LOI (Letter of Intent) प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी.
कर्जासाठी जाचक अटी शिथिल करा: सात-बारा उताऱ्याची अट आणि चार लाखांवरील कर्जासाठी दोन जामीनदार मागण्याची अट शिथिल करण्यात यावी. अनेक तरुणांकडे स्वतःची जमीन नसल्याने किंवा जामीनदार न मिळाल्याने ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
दलालांची मध्यस्थी थांबवून पारदर्शकता आणा: महामंडळाच्या विविध योजना, सबसिडी आणि व्याजदराबाबत अधिकारी पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करतात, परंतु दलालांमार्फत प्रकरणे वेगाने केली जातात. हा प्रकार थांबवून सर्वसामान्यांना थेट लाभ द्यावा.
पेंडिंग सबसिडी व व्याज परतावा त्वरित द्या: कर्ज मंजूर झाल्यानंतर सबसिडीचा पैसा बँकेकडे येण्यासाठी ६ ते ८ महिने लागतात. गेल्या ६ महिन्यांपासून मिळणारा व्याज परतावा थकला असून, व्याजाचे हप्ते स्वतः भरावे लागत असल्याने नवीन उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत. हा थकीत व्याज परतावा तातडीने जमा करण्यात यावा.
CIBIL (सिबिल) स्कोअर बाबत शिथिलता: सिबिल स्कोअर ६५० पेक्षा कमी असलेल्या किंवा नवीन लहान कर्जदारांची प्रकरणे नाकारली जातात. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा.
२०२३-२४ मधील बिनव्याजी कर्ज प्रकरणे अपलोड करण्याची संधी द्या: महामंडळाच्या वेबसाईटवर पर्याय उपलब्ध नसल्याने रखडलेली २०२३-२४ ची बिनव्याजी कर्ज प्रकरणे पुन्हा अपलोड करण्याची संधी देण्यात यावी.
त्रुटी निवारण (Claim Hold) जलद गतीने करा: कागदपत्रांमधील त्रुटींचे निवारण होण्यास होणारा विलंब टाळून जलद गतीने कामे पूर्ण करण्यात यावीत.
करमाळा तालुक्यातील १००% कामे ऑनलाईन व संपर्कसुलभ करा: सोलापूर हे करमाळ्यापासून लांब असल्याने गोरगरीब बांधवांना तेथे जाणे परवडत नाही. त्यामुळे १००% कामे ऑनलाईन, ई-मेल किंवा फोनद्वारे करण्यात यावीत आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून सहकार्य करावे.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज, करमाळा (ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या वतीने सचिन अशोक काळे, प्रवीण हीरगुडे यांच्यासह मराठा बांधवांनी हे निवेदन प्रशासनाला सादर केले आहे.यावेळी सोलापूर विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत सकल मराठा समाजाच्या वतीने सचिन अशोक काळे , मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण , सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद नेते जाधव , करमाळा स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रवीण हेरगुडे , शंभू जगताप व अन्य बांधव त्या वेळी उपस्थित होते शासनाने व महामंडळाने या मागण्यांचा त्वरित विचार न केल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
Post Views: 15
Previous Post

माढ्यात पाण्यासाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित

Next Post

दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीच्या सात खेळाडूंना सात सुवर्ण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीच्या सात खेळाडूंना सात सुवर्ण

दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीच्या सात खेळाडूंना सात सुवर्ण

ताज्या बातम्या

एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे सत्यसाईबाबा नगर परिसरातील नागरिक संतप्त

August 12, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन -शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन -शंकर गायकवाड

August 12, 2026
प्राचार्या रेखा पाटील यांना एम.आय.टी .व्ही जी. एस शाळेचा दुहेरी पुरस्कार

प्राचार्या रेखा पाटील यांना एम.आय.टी .व्ही जी. एस शाळेचा दुहेरी पुरस्कार

August 12, 2026
अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यावर बार्शी तालुका पोलिसांचा छापा, रुपये १० हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यावर बार्शी तालुका पोलिसांचा छापा, रुपये १० हजारांचा मुद्देमाल जप्त

August 12, 2026

गुळव्वा, मातीतून जन्मलेला आनंदोत्सव – सोलापूरच्या सीमेवरचा अनोखा बालसण

August 12, 2026

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सेवासदन महाविद्यालयाचा डंका

August 12, 2026
कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पीएसआय राजकुमार डांगे यांची कौतुकास्पद कामगिरी

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पीएसआय राजकुमार डांगे यांची कौतुकास्पद कामगिरी

August 12, 2026
दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीच्या सात खेळाडूंना सात सुवर्ण

दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीच्या सात खेळाडूंना सात सुवर्ण

August 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1052849

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!