Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी २४ तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या

तरुण भारतbyतरुण भारत
August 6, 2026
in marathwada
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट –  समर्थ नगर,अक्कलकोट येथील श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (७७) या ज्येष्ठ महिलेच्या पर्समधून चोरीस गेलेली अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि पेन्शनचे ₹१२,६०० अवघ्या २४ तासांत शोधून काढत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने आरोपीला जेरबंद केले. पोलिसांच्या वेगवान, तांत्रिक आणि अचूक तपासामुळे गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक केले आहे. पोलीसांच्या सहकार्यामुळे लक्ष्मीबाई गड्डद यांच्या डोळ्यातुन आनंदाश्रु थांबु शकले नाहीत . त्यांनी साऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्गाचे आभार मानले .
समर्थ नगर येथील लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (वय ७७) या सकाळी फत्तेसिंह चौकातील गणेश पोतदार यांच्या के.पी. कॉम्प्युटर्स एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात पेन्शन काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी सकाळी ११.२४ वाजता ₹१२,६०० काढून ते अर्ध्या तोळ्याच्या बोरमाळीसह पर्समध्ये ठेवले. बीपीचा त्रास झाल्याने काही वेळ त्या सेवा केंद्रात बसून राहिल्या आणि नंतर रिक्षाने घरी गेल्या. घरी पोहोचल्यानंतर मुलाला पैसे देण्यासाठी पर्स उघडली असता रोख रक्कम आणि बोरमाळ गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घाबरलेल्या लक्ष्मीबाईंनी तातडीने ग्राहक सेवा केंद्र गाठून चौकशी केली. प्राथमिक पाहणीत कोणताही ठोस धागा हाती लागला नाही.परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजही अस्पष्ट असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र डी.बी. पथकाने हार न मानता फत्तेसिंह चौकातील आयडीबीआय बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेतला. त्यामधील संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांची कसून चौकशी केली. अखेर आरोपीपर्यंत पोहोचत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्रमांक ०४३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली दागिना आणि पैसा हस्तगत केला. चोराला अटक करण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल केदारनाथ सुतार यांनी केली.पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची तातडीने गांभीर्याने दखल घेत अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला अटक केल्याने अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.आणी विशेष करुन डी.बी. पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे यांनी या तपासाची खरे मानकरी ठरले आहे.त्यानंतर श्रीमती लक्ष्मीबाई गड्डद यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे व पोलीस निरीक्षक अविनाश पवार आणी डी.बी. पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे व उत्तर पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केले.
Post Views: 9
Previous Post

हंजगी आश्रम शाळेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे यांचा सन्मान

Next Post

ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असावा प्रमुख मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असावा प्रमुख मागणी

ताज्या बातम्या

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

August 6, 2026
विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

August 6, 2026
पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

August 6, 2026

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

August 6, 2026
डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

August 6, 2026

मुख्यमंत्री फडणवीस व आमदार देशमुख यांची वर्षा निवासस्थानी बैठक

August 6, 2026

टिकारीयाज सायन्स हॉबी सेंटरतर्फे राज्यस्तरीय “विज्ञान निबंध” लेखन स्पर्धेचे आयोजन

August 6, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

August 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1031421

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!