अक्कलकोट – तालुक्यातील हंजगी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेला सामाजिक कार्यकर्ते तथा लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे व माहिती अधिकार तालुका अध्यक्ष देवेंद्र शिंदे यांनी भेट देऊन शालेय परिसर,भौतिक सुविधा, गुणवत्ता व विद्यार्थी संख्या पाहून समाधान व्यक्त केले.यावेळी शाळेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते वसंत देडे व माहिती अधिकार तालुका अध्यक्ष देवेंद्र शिंदे यांचा यथोचित सन्मान करुन त्यांच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वसंत देडे म्हणाले की, माझ्या घरच्या गरीबी परिस्थितीमुळे मला वेळेवर शालेय जीवनात पाठ्यपुस्तक विकत घेता आले नाहीत. याचाच परिणाम माझ्या शालेय जीवनावर होऊन माझा शिक्षणात खंड पडला गेला. याचाच दु:ख आज ही मला भेडसावत आहे.याचीच जाण ठेवून मी आज लहूजी पेंटींग कामगार युनियनच्या माध्यमातून मिळविलेल्या कमाईतून आज गरीब,गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून मदत करत असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिदानंद बाबा तर आभार मल्लिनाथ होसुरे यांनी मानले.
Post Views: 6