पंढरपूर – नगरपालिकेच्या मुख्य इमारती लगत असलेल्या बुरुड गल्लीव घडशी गल्ली परिसरात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. एकीकडे चंद्रभागानदी सध्या दुथडी भरून वाहत असतानाही या भागात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांनी त्यांच्या पाण्याच्या समस्येबाबत विद्यमान नगरसेविका प्रतीक्षा शिरसट यांच्याकडे तक्रार केली. यानंतर त्यांचे पती व भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तातडीने नगरपालिकेचा टँकर या भागात आणून नागरिकांची पाण्याची तात्पुरती सोय केली.
“चंद्रभागा नदी भरून वाहत असतानाही शहरातील गल्लीबोळातील नागरिकांना पाणी मिळत नाही, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.
——————
नगरपालिकेने या भागातील पाण्याची समस्या युद्धपातळीवर सोडवणे गरजेचे आहे.” तसेच “या भागातील पाण्याचा प्रश्न त्वरित न सोडवल्यास नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या दालनासमोर सर्व महिलांसह घागर मोर्चा काढण्यात येईल.”
विक्रम शिरसट (माजी नगरसेवक, पंढरपूर)

























