माळशिरस – मनुष्याने महामानवांचे विचार घेऊनच काम करणे गरजेचे असून त्यांची शिकवण अंगीकृत करावी असे प्रतिपादन हृदयरोग तज्ञ डॉ. एम.के. इनामदार यांनी माळशिरस येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभ समारंभात बोलताना व्यक्त केले .यावेळी डॉ.इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण व डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
पुढे बोलताना डॉ. इनामदार म्हणाले मी महामानवांचे विचार व शिकवण घेऊनच काम करीत आहे. डॉ. आंबेडकर हे शिक्षणाने मोठे झाले. आपणही आपल्या मुलांना शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. समाजाने व्यसनमुक्त होणे गरजेचे असून व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त होताना दिसत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून यापुढेही मी समाजासाठी काम करीत राहणार आहे.यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक विकास दिंडूरे,नगराध्यक्षा प्राजक्ता ओहोळ ,माणिकराव वाघमोडे,आप्पासाहेब देशमुख,पांडुरंग वाघमोडे,अड.सोमनाथ वाघमोडे,सचिन वावरे,सुरेश टेळे,शिवाजीराव देशमुख,संतोष वाघमोडे,रघुनाथ चव्हाण,डॉ .सुभाष देशमाने,अड.पी.इ.कुलकर्णी .डॉ नितीन सिद,विनोद दोशी,प्रवीण अंबुडकर,प्रफुल्ल शहा.यांच्यासह जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते,
जयंती कार्यक्रमानिमित्त आज सकाळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली .


























