सोलापूर : महानगरपालिका अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०२५-२०२६ च्या निधीमधून आज सोलापूर मनपाच्या मालकीच्या कोटणीस कॉम्पलेक्स येथे अंतर्गत नूतनीकरण कामांचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच शहराध्यक्ष रोहिणी तळडवकर, नियंत्रण अधिकारी तपन डंके, कनिष्ठ अभियंता चेतन प्रचंडे, हेडगेवार रक्त पेढीचे सुहास जोशी, मिलिंद फडके, प्रकाश कुलकर्णी, अभिजित टाकलीकर, माधव देशपांडे यांची उपस्थिती होती.
















