Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चोरीस गेलेले ९ लाखांचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत, एका महिलेस केले जेरबंद

तरुण भारतbyतरुण भारत
April 7, 2026
in crime
0
चोरीस गेलेले ९ लाखांचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत, एका महिलेस केले जेरबंद
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – येथील बसस्थानका वरुन महिलेच्या पस’ मधील चोरीस गेलेले सुमारे ९ लाख रुपये किंमतीचे दागिने शहर पोलीसांनी हस्तगत करून दमदार कामगिरी केली. या चोरी प्रकरणी पोलीसांनी एका महिलेस जेरबंद केले आहे.

या कारवाई बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, येथील शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. १३०/२०२६ भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी सुषमा दत्तात्रय पाटील( वय. ४४ वर्षे, रा. देगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांचे  १७ मार्च २०२६  पंढरपूर बस स्थानकावर पर्समधील सोन्याचे दागिने अज्ञात चोरटयाने चोरले होते.

त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास चालू असता सदर गुन्हयाचे तपासकामी पथके तयार करून पंढरपूर व सोलापूर शहरातील एकुण ६२ सी.सी.टी. व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवर, सी. डी.आर चे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात महिला आरोपी  आयेशा युसुफ शेख (वय. ३६ वर्षे, रा. शाहजाहूर दर्गा समोर, १०६ रेहमतबी झोपडपटटी, सिध्देश्वर पेठ, सोलापूर जि. सोलापूर) हिने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने तिचा रायचूर कर्नाटक येथे जावुन शोध घेवुन तिला कर्नाटक येथुन ताब्यात घेवुन तिच्याकडे नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्याबाबत तपास केला असता तिने नमुद गुन्हयातील सोन्याचे दागिने  एक ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, एक १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असे एकुण ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे ९,००,०००/- रुपये किंमतीचे तिच्याकडुन जप्त करून सदर गुन्हयातील महिला आरोपी हीस अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक  प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, पोह/३९८ सिरमा गोडसे, पोह/१७८९ सचिन हेंबाडे, पोह/१३०७ सोमनाथ पाटील, पोना/५६३ साहिल तांबोळी, पोना/५४६ कृष्णा पकाले, पोकॉ/१२१६ शहाजी मंडले, पोकॉ/१३०४ दिपक नवले, पोकॉ/१५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ/१२४० हर्षद ठाकर तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि ११८२ रतन जाधव यांनी केली .

Post Views: 37
Previous Post

ग्राहकांची उघड लूट; कोल्ड्रिंक्सवर कूलिंग चार्ज’च्या नावाखाली जादा वसुली

Next Post

नूतनीकृत कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नूतनीकृत कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नूतनीकृत कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा – प्रशांत माने

May 25, 2026

हम कमिशनर है म्हणणाऱ्या रीलवाल्याचा पोलिसांनी उतरवला माज

May 24, 2026

आरक्षणावर सडेतोड बोलले ओबीसी नेते हाके

May 24, 2026

नाभिक समाजाच्या पुढाकारातून दोन गरीब दाम्पत्याच्या जुळल्या रेशीमगाठी

May 23, 2026

निकाळजेंच्या घरी सांत्वनासाठी पोहोचल्या खा प्रणिती शिंदे

May 23, 2026

श्री शक्ती सेवा समिती सोलापूरच्या वतीने ऐश्वर्या लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवात सुवासिनींने केले पूज

May 23, 2026

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

May 23, 2026

अप्रिय घटना नको, त्वरित पोलिसांना संपर्क साधा ईदसाठी सूचना

May 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0877783

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697