सदर झेंडावंदन सोहळ्यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाणेमधील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच प्रतिष्ठीत नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मोबाईल हरवलेल्या नागरीकांना त्यांचे एकुण 45 मोबाईल शोधून त्यांना परत देण्यात आले. सर्व मोबाईल एकुण 10,69,500 रु किंमतीचे होते.
सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांचे दिर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेऊन भारत सरकारचे गृहमंत्रालयाकडून “उत्कृष्ठ सेवा पदक” प्राप्त झालेबद्दल पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे व सर्व अधिकारी अंमलदार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मौजे कोंडी प्राथमिक शाळा व जिजामाता प्रशाला येथे भेट देऊन वृक्षारोपण केले व जागर नारी शक्तीचा या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच कोंडी तांडा येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन वृक्षारोपण व 100 वृक्षांचे वाटप केले आहे.





















