पिलीव – माळशिरस तालुक्यात यंदा भिषण दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या पहील्या यादीत माळशिरस तालुक्याचा समावेश आहे. दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपञे तलाठी कार्यालयात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी दिसुन येत आहे.माळशिरस तालुक्यात पावसाने यंदा दडी मारल्यामुळे पेरलेली बाजरी, मका ,कडवळ व इतर सर्वच पिके जळुन गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा मशागतीची खर्च, बि बियाणे, खतांचा केलेला मोठा खर्च वाया गेला आहे .यामुळेच अडचणीत असणारा शेतकरी जास्तच अडचणीत सापडला आहे. या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी मदत व्हावी म्हणून शासनाने पंचनामे करणयाचे आदेश दिले आहेत. आणी हे पंचनामे करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपञे यामध्ये विहीत नमुन्यातील अर्ज, 7,12,8 अ,आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, फार्मर आयडी, पिक नुकसानीचा फोटो अशी आवश्यक कागदपञे तलाठी कार्यालयात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी दिसुन येत आहे. पिलीव येथे पिलीव, सुळेवाडी, झिंजेवस्ती या तिन गावातील कागदपञे जमा करुन घेतली जात आहेत. सध्या तर पिलीव व सुळेवाडी येथील शेतकऱ्यांची गर्दी दिसुन येत आहे माञ झिंजेवस्ती येथील गर्दी त्यामानाने कमीच आहे. दुष्काळामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून किमान दिवाळीला तरी चार पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकरी बांधव ठेवुन आहेत. यामुळेच शेतकऱ्यांची सध्या धावपळ दिसुन येत आहे. सर्व्हर बंद असल्यामुळे अडचणी_ गेल्या दोन तिन दिवसांपासून 7,12 उताराचा सर्व्हर बंद असल्यामुळे अडचण येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढला नसल्यामुळे व तो ॲप्रोवहल करुन घेण्यासाठी अडचण येत आहे. चौकट _ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामा ही मदत करण्यासाठी औपचारिक बाब आहे. पण सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. माञ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यातील महुद येथे केलेल्या विधानांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरले आहे. यामध्ये त्यांनी कॅनालखालील पिके मला हिरवी दिसत आहेत असे त्यांनी विधान केले आहे .माञ शेतकरी म्हणतात पावसाळा संपला तरीही या भागात पाऊसच पडला नाही. आमच्या भागातील ओढे ,नाले ,बंधारे अद्यापपर्यंत कोरडे ठणठणीत आहेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा मदत मिळालीच पाहीजे अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. चौकट _ संपुर्ण माळशिरस तालुक्यातच भिषण दुष्काळी परिस्थिती आहे .तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी न लावता सरसकट मदत मिळाली पाहीजे. _ तुषार लवटे ,माजी सरपंच ग्रामपंचायत, कुसमोड.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















