सोलापूर – संगमेश्वर कॉलेज येथील इंग्रजी विभाग आणि सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स’ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.३० या वेळेत संगमेश्वर कॉलेजमध्ये विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ‘इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट – सीझन ५’ पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाला चालना देणे, लेखन व संभाषण कौशल्याची चाचणी घेणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. यामध्ये लिखित आणि संभाषणात्मक अशा दोन्ही कौशल्यांची परीक्षा घेतली जाईल.
विजेत्यांना रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी दिली जाणार असून सर्व सहभागींना प्रमाणपत्रे मिळतील. यासाठी प्रवेश शुल्क १५० रुपये असून नोंदणीची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२६ आहे. “Master English & Master the World” या संदेशासह होत असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक नागेश पाथरूट (९२७२५४६२७१) किंवा संयोजक प्रा. रेवणसिद्ध हल्लोळी (७७७४९४८४११) यांच्याशी संपर्क साधावा.





















