पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील स्वप्नील शंकर भंडलकर याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून मृदा व जलसंधारण अधिकारी गट ,ब पदी नियुक्ती झाली आहे .अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने पाचव्या प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले.तयाचे दहावीपर्यंतचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात, सोलापूर येथे अभियाञीकी डिप्लोमा, तर कोल्हापूर येथे अभियांञीकीची पदवीचे शिक्षण पुर्ण केले.त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली आईने दुसऱ्याची धुणी _ भांडी करुन तर वडीलांनी दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करुन स्वप्नीलला शिक्षणासाठी मदत केली .चारवेळा त्याला यशाने हुलकावणी दिली माञ पाचव्या प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले .याबद्दल त्याची समाजाच्यावतीने पिलीव बाजारपेठेतुन जंगी मिरवणूक काढण्यात आली तसेच त्याचा नागरी आघाडीचे अध्यक्ष आरिफखान पठाण, माजी सरपंच तथा माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अमोल मदने, दामोदर लोंखंडे, माजी उपसरपंच मोहन करांडे, दीपक केसकर, महेश बोडरे, तुषार जाधव, आबा बनसोडे, रोहन नारनवर, हवालदार मौला मुलाणी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा सन्मान करण्यात आला. चौकट _ सन्मानानंतर स्वप्नील भंडलकर याने आपल्या परिस्थितीचा विचार न करता जिद्द, चिकाटी व परिश्रम घेतल्यास यश हमखास मिळते. पिलीव परीसरातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व चांगल्या पदावर पोहचावे असे सन्मानानंतर आवाहन केले. फोटो _ पिलीव येथे स्वप्नील भंडलकर यांचा सन्मान करताना आरिफखान पठाण, अमोल मदने, मोहन करांडे व इतर मान्यवर.