Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बसस्थानकावरुन महिला प्रवाशाचे 10 लाख 8 हजारांचे दागिने पळविले

तरुण भारतbyतरुण भारत
October 29, 2025
in crime
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – बसस्थानकावरुन जाणार्‍या मंगळवेढा-जत या बसमध्ये चढताना एका 46 वर्षीय महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले 10 लाख 8 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द मंगळवेढा  पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मंगळवेढा बसस्थानकावरील प्रवाशांचे दागिने चोरण्याची मालिका संपता संपत नसल्यामुळे प्रवाशी वर्ग धास्तावला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी महिला स्नेहा रामचंद्र शिंदेे (वय 46,रा.जुळे सोलापूर) ही तिच्या मुलाबाळासह व तिचा दीर पिराजी शिंदे (रा.यळवी ता.जत) यांच्यासह सोलापूर येथून सकाळी 11.30 वाजता फिर्यादी सोलापूर-सांगोला बसमध्ये बसून मंगळवेढ्याकडे निघाली होती. यावेळी सीटवर बसल्यानंतर तिच्या पर्समध्ये 10 लाख 8 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे विविध दागिने ठेवले होते. दुपारी 1.30 वाजता मंगळवेढा येथील बसस्थानकावर उतरल्यानंतर पर्समध्ये ठेवलेले दागिने आहेत का ? याची खातरजमा केल्यावर दागिने होते. दुपारी 2 वाजता मंगळवेढा-जत या बसमध्ये बसल्यावर पर्स मांडीवर ठेवून पर्सची चैन बंद केलेली होती. त्यावेळी फिर्यादीने पर्समध्ये सोने आहे हे पाहण्यासाठी पर्सची चैन उघडून पाहिल्यावर त्यामधील ठेवलेले सोने दिसून आले नाही.

यावेळी खात्री पटली की अज्ञात चोरट्याने पर्सची चैन उघडून चोरुन नेले आहे. यामध्ये 1 लाख 92 हजार 500 रुपये किंमतीचे गंठण,70 हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण,77 हजार रुपये किंमतीच्या बांगड्या,21 हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स,3 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 50 गॅ्रम वजनाच्या बांगड्या,1 लाख 19 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रासलेट,1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे लॉकेट, 42 हजार रुपये किंमतीचे 6 ग्रॅम वजनाचे लॉकेट,17 हजार 500 रुपये किंमतीचे वेढणी अंगठी,14 हजार रुपये किंमतीचे दोन नग वेढणी अंगठी असा एकूण 10 लाख 8 हजार रुपये किंमतीचा पर्स मध्ये ठेवलेला सोन्याचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान दुपारी घडलेली चोरीची घटना रात्री उशीरा दाखल झाली आहे. ठाणे अंमलदाराने सुरुवातीला गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याने मोठा विलंब झाला. तक्रारदाराने व अन्य सुज्ञ नागरिकांनी थेट पोलीस अधिक्षक यांना या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बसस्थानकावर यापुर्वी अनेक महिलांचे दागिने चोरण्याचा प्रकार  घडला असून चोरीची नोंद पोलीसात होते मात्र त्याचा आजतागायत चोरीचा तपास पोलीसांनी न लावल्यामुळे चोरीची मालिका थांबता थांबेना अशी म्हणण्याची वेळ नागरिकावर येत आहे. मागील चार दिवसापुर्वीच तेथे दागिने चोरण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. येथे नेमलेले पोलीस ड्यूटी दरम्यान जाग्यावर थांबत नसल्यामुळे चोरटे याचा फायदा घेवून आपले उखळ पांढरे करत असल्याच्या तक्रारी आहेत. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपुर्वक लक्ष घालून येथील पोलीस प्रशासनास मार्गदर्शन करुन येथील होणार्‍या चोर्‍या थांबवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे,पोलीस हवालदार रवी माने,पोलीस अंमलदार मनोज राठोड, सुरज रामगोंडे यांचे पथक मंगळवेढ्यात सोमवारी दाखल झाले. या पथकाने बसस्थानकामधील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करुन सदर चोरीचा तपास करण्याचा विशेष प्रयत्न केला. रात्री उशीरा पर्यंत हे पथक बसस्थानकावर ठाण मांडून होते.

Post Views: 26
Previous Post

श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगाम

Next Post

जुगार अड्ड्यावर छापा, 2 लाख 64 हजाराचा मुद्देमाल जप्त

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जुगार अड्ड्यावर छापा, 2 लाख 64 हजाराचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026
प्रा. डॉ. आडसूळ यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षकभूषण” पुरस्कार प्रदान

प्रा. डॉ. आडसूळ यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षकभूषण” पुरस्कार प्रदान

May 25, 2026
तिकीट तपासनीस यांच्यासाठी अग्निसुरक्षा कार्यशाळा आयोजित

तिकीट तपासनीस यांच्यासाठी अग्निसुरक्षा कार्यशाळा आयोजित

May 25, 2026
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

May 25, 2026
दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरुवात

दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरुवात

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878602

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697