पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात इयत्ता नववी व दहावीच्या वर्गाची विद्यार्थी _ पालक _ शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बागल सर होते. यावेळी नववीमधील तिन्ही तुकडयातील व दहावीच्या तिन्ही तुकडयातील निकालाचे वाचन संबंधित शिक्षकांनी केले. तर रयत गुरुकुल अनिवासी प्रकल्पाबाबत विभागप्रमुख पाटील सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पालकांनी वेगवेगळ्या अडचणी मांडल्या त्या संबंधित शिक्षकांनी योग्य उपाययोजना करणार असल्याचे सांगीतले. यावेळी ॲड वैभव मेथवडे यांनी लवकरात लवकर नवीन इमारत बांधण्याचे नियोजन करावे यासाठी माजी विद्यार्थी सहकार्य करतील असे सांगीतले. यावेळी रोडरोमिओ, मुलींची सुरक्षीतता, मोबाईलचा योग्य वापर यासह निकालाबाबत विवेचन करण्यात आले. तसेच दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. या सहविचार सभेस शाळा व्यवस्थापन समीती सदस्य संजय पाटील सर, अतुल नष्टे, शहाजी वाघ, बाबासाहेब पुकळे, यांच्यासह अनेक पालक मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच पाटील सर, कोळेकर मॅडम, इंगळे मॅडम, पावले सर ,भंडारे सर, प्रवीण मेटकरी सर, इंगळे सर ,पाटील सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रस्तावित पावले सर यांनी केले तर आभार इंगळे सर यांनी मानले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















