देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत पंढरपूर पंचायत समितीच्या समोर ‘नमो सेवा सप्ताह जनजागृती पर पथनाट्य’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
भारतीय जनता पार्टी पंढरपूर तसेच पंढरपूर–मंगळवेढ्याचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार समाधान अवताडे ,माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण त्याचबरोबर पंढरपूर तालुक्याचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.प्राजक्ता बेणारे यांच्या संकल्पनेतून व दिग्दर्शनातून हे पथनाट्य पार पडले.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला दिलेल्या कल्याणकारी योजनांचे नाटकीय सादरीकरण पथनाट्यातून करण्यात आले. यासाठी पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी व इंजिनिअरिंगच्या २० विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी या कार्यक्रमास युवा नेते, मंगळवेढा नगरपरिषदेचे विद्यमान लोकप्रिय नगरसेवक सोमनाथ अवताडे पंढरपूर पंचायत समिती सभापती डॉ. शुभम आगावणे, पंढरपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे,भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री अनुप देवधर, तालुकाध्यक्ष सुभाष मस्के,
पंढरपूर भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष डॉ.ज्योती शेटे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख व जिल्हा सरचिटणीस सौ. सुप्रिया काकडे, मंगळवेढा भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.आशा पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास विशेष सहकार्य स्वेरी कॉलेजचे प्रमुख डॉ.बीपी रोंगे , एम.एम पवार , डॉ.एम.एम पवार,डॉ.एम.एस मठपती, प्रा.अमोल चौंडे या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.
यामध्ये उत्तम सादरीकरण करणारे विद्यार्थी ज्ञानेश्वर शिंदे, शुभम मोरे,आयुष पवार,योगेश आनंदे,चैतन्य पिसे,अंकिता राजमाने,आरती सावंत,साक्षी थोरात, सिद्धी कांबळे,आदित्य मेटे,सुप्रिया क्षीरसागर,राजेश्वरी सुतार,सानिका बंडू इंगवले, ऋतुजा काळदाते, हर्षद लोंढे,प्रणव नवले, ऋषिकेश नवले,शैलेश आंधळे,मनोज शिंदे, विश्वजीत भोंग, श्रेयस लोखंडे आदी सहभागी झाले होते.
तसेच या सर्व कार्यक्रमाचे उत्तम चित्रीकरण कार्तिक ढवळे यांनी केले
या पथनाट्यानंतर लोकप्रिय नगरसेवक सोमनाथ अवताडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनास आमंत्रित केले.
Post Views: 11