कारी – दिवसेंदिवस रस्त्याचे समस्या खूपच गंभीर होत चालले असून रस्त्यालगतची शेतकरी रस्त्याच्या सीमांकनाच्या पुढे जाऊन अतिक्रमणाची थैमान मांडत आहेत.. ग्रामीण भागात रस्त्यामुळे शेतीच्या सुधारणेला ठिकठिकाणी अडथळे निर्माण होत असून अशा रस्त्याच्या समस्येसाठी संबंधित विभागाने लक्ष घालणे खूप गरजेचे आहे. काऱी ते टोणेवाडी ग्रामीण मार्ग ७१ गेले अनेक दिवसापासून सुधारणेपासून वंचित आहे. दोन्ही गावाची देवाण-घेवाण याच मार्गातून होत असून अनेक फुल उत्पादक नियमित धाराशिव बाजारपेठेसाठी या मार्गावरुन जातात तसेच अनेक दूध उत्पादक या मार्गाचा वापर करावा लागतो. ग्रामीण मार्गाचे सीमांकन किती असते ते सुरक्षित कसे ठेवावे याचे भान लगतच्या शेतकऱ्यांना राहिलेले नाही. असाच प्रकार कारी ते टोणेवाडी रोड लगत झाला असून तब्बल अर्धा किलोमीटर रस्ता सीमाकांनाच्या पुढे जाऊन मशीनच्या सहाय्याने खोदून टाकला आहे. परिणामी दोन्ही गावासोबत या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे शेतकरी अरुण क्षीरसागर याने सांगितले. तसेच रोड लगत असणारे मोठमोठाले वृक्ष उकरुन टाकले आहेत. दिवस वाढत चाललेले उष्णतेचे प्रमाण याचे मुख्य कारण म्हणजे ठीकठिकाणी होत चाललेली अवैध वृक्षतोड हीच असून वन विभाग देखील अशा गोष्टीला अभय देत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे रस्ता खोदाई आणि दुसरीकडे रस्त्यालगत असणारे वृक्ष तोडून देखील संबंधित उचकटण्यावर कार्यवाही होत नसेल तर संबंधित विभागाने आत्मचिंतन करावे, असे अनेक पादचाऱ्यांना वाटू लागली आहे. अशा लहान गोष्टीमुळेच कायदा मोडणाऱ्याची बेबंदशाही गावात वाढल्याने अनेक हिंसक घटना घडू लागल्या आहेत. गेले अनेक वर्षापासून रोड लगतचे अनेक वृक्ष तोडून अनेकजणांनी त्यांची विल्हेवाट लावली असून दोन्ही विभाग डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही विभागाने रस्ता लगत असणाऱ्या वृक्ष ना आधुनिक प्रणालीद्वारे जिओ मॅप्पीग करणे काळाची गरज आहे, अशी मागणी होत आहे.
“सार्वजनिक रस्ताचे अतिक्रमण करणाऱ्यावर आमचे विभाग कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.”
ढावारे, उप अभियंता (जि. प.)
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बार्शी
Post Views: 3