कुर्डुवाडी – भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज कुर्डुवाडी येथे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या कथित बेताल व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवित संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकशाहीत राजकीय मतभेद असले तरी सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी जबाबदारीने आणि सभ्य भाषेत वक्तव्य करणे अपेक्षित आहे. आक्षेपार्ह व समाजात तेढ निर्माण करणारी विधाने टाळली पाहिजेत. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची संबंधित यंत्रणांनी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.























