सोलापूर – शहरातील आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या रोटाव्हायरस लस आणि आयपीव्ही लस जे गंभीर अतिसार आणि पोलिओ प्रतिबंधक असून मागील दोन महिन्यांपासून उपलब्ध नाहीत. याची तक्रार काही नागरिकांनी केली असता, संभाजी आरमार च्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या उपआयुक्त विणा पवार यांना निवेदन देत या लसींचा पुरवठा लवकरात लवकर करावा आणि उपलब्धतेनुसार साठवणूक करण्याचे आदेश संभंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावे.

यावेळी संभाजी आरमारचे सरचिटणीस गजानन जमदाडे, सागर ढगे, राज जगताप, सतीश सारोळे, प्रदीप मोरे, सुधाकर करणकोट,शुभम खंडागळे उपस्थित होते.























