सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर पुढील दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी महापौर कोंड्याल यांनी मुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचीदेखील सदिच्छा भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.