अकलूज -शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेचे संचालक मा .श्री .वसंत पांडुरंग जाधव यांचे हस्ते करण्यात आले . कु.श्रेया काळे, कु.प्रगती मासाळ, कु.आयेशा सय्यद व कु .कावेरी साठे या अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनींचा व पालकांचा सत्कार सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन करण्यात आला .त्याचबरोबर विषयात प्रथम आलेल्या कु.विनिया बनकर,अनुष्का लोखंडे,सृष्टी गायकवाड ,सृष्टी खुडे ,कृष्णा घुले ,प्राजक्ता ढगे या विद्यार्थिनीचाही सत्कार करण्यात आला .
*अध्यक्ष मनोगतात श्री. जाधव साहेबांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर विद्यार्थिनींना आयुष्यात यश संपादन करण्यास सांगितले .*
प्रशालेतील यशस्वी सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे मार्गदर्शक संचालक मा .श्री .जयसिंह मोहिते- पाटील ,अध्यक्ष मा .श्री .संग्रामसिंह मोहिते -पाटील,संचालिका मा. कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सदाशिवराव माने विद्यालयाचे सभापती मा. चि .सयाजीराजे मोहिते – पाटील ,सचिव मा .श्री अभिजीत रणवरे ,सहसचिव मा .श्री हर्षवर्धन खराडे यांनी अभिनंदन व कौतुक केलेले आहे .
कार्यक्रमासाठी मा.श्री.विनोद जाधव व यशस्वी विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पवार मॅडम , मनोगत कोळी सर ,सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. रचना रणनवरे मॅडम यांनी व आभार सौ. वृषाली थोरात मॅडम यांनी केले.