पंढरपूर – दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीसाठी पंढरपुरात यंदा देखील लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी झालेले होते. एवढ्या प्रचंड गर्दीत प्रत्येक भाविकाला सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी सलग दुसऱ्या वर्षी मंत्री गिरीश महाजन स्वतः मैदानात उतरले होते. मंत्री असून देखील कोणताही अर्विभाव न बाळगता तब्बल तब्बल दहा ते बारा तास पोलिसां सोबत नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी गर्दी नियोजनाची जबाबदारी सांभाळुन एक प्रकारे विठुरायाचे ते देखील सेवेकरीच बनले.
वारकरी संप्रदायातील महाकुंभ मेळा अर्थात आषाढी वारी. या आषाढी यात्रेसाठी या वर्षी विक्रमी गर्दीची नोंद झाली. पोलिसांकडून तर यावर्षी वारीसाठी पंढरपूरात तब्बल ३२ लाख वारकऱ्यांनी हजेरी लावल्याची माहिती देण्यात आलेली आहे. सुमारे एक ते सव्वा लाख लोकवस्तीच्या तिर्थक्षेत्र पंढरपूरात जर यात्रेसाठी ३२ लाख वारकरी सहभागी होत असतील आणि यात्रा निर्विघ्न पणे पार पाडली जात असेल तर ते केवळ संपुर्ण प्रशासनाचे तसेच येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे आणि पंढरपूर वासियांचेच श्रेय आहे. पण हे जरी खरे असले तरी हे सर्व घडवून आणणारा करता करविता हा केवळ पांडुरंगच आहे हे देखील विसरुन चालणार नाही. कारण त्यांच्यावरील भक्तींमुळेच दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक येथे आवर्जून येत असतात आणि त्याच्याच भरोशावर यात्रा पोहच करुन अगदी निर्विघ्नपणे घरी देखील परतत असतात.
मात्र हे सर्व होत असताना अगदी आळंदी, देहू पासून ते पंढरपूर पर्यंत येणाऱ्या दिंडी सोहळ्यांना तसेच पंढरपूर मुक्कामी अनेकांचे सेवाभावनेने या वारीसाठी हात लागलेले असतात. असाच सेवाभाव मागील वर्षी पासून भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे मंत्री तसेच संकंटमोचक, सरकारच्या मदतीसाठी तत्पर म्हणून ओळखले जाणारे गिरीष महाजन विठुरायाचे सेवेकरी म्हणून सेवा बजावित आहेत. यावर्षी त्यांच्या सेवेचे हे दुसरे वर्षे होते. एखादा मंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा पार पडल्या नंतर थेट मुंबई गाठु शकला असता. पण मंत्री महाजन यांनी तसे न करता आषाढीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा नदीकडू मंदिराकडे येणारी वारकरी भाविकांची गर्दी नियंत्रणात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मोलाची जबाबदारी पार पाडलेली आहे.
मंत्री महाजनांनी शहरातील यात्रेच्या दृष्टीने महत्वाच्या महाद्वार परिसरातील नियंत्रण मनोरा आणि आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सातत्याने वारकऱ्यांच्या गर्दीवर,वारीच्या एकुण परिस्थितीवर लक्ष ठेवत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. केवळ आदेश देणारे नव्हे, तर प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून जबाबदारी पार पाडणारे नेतृत्व म्हणून मंत्री गिरीष महाजन यांनी पुन्हा एकदा याही वर्षी आषाढी यात्रेमध्ये वेगळी छाप पाडली आहे.
राज्यात, परराज्यात, परदेशात कुठेही आपल्या राज्यातील नागरिक संकटात असोत किंवा आपल्या राज्यात कुठेही दरड कोसळु देत, महापूर येवू देत, पावसामुळे नागरिक संकटांत असू देत त्या ठिकाणी सरकारच्या वतीने जी कमी असते ती हमखास भरुन काढण्याची हमी म्हणजेच मंत्री गिरीष महाजन असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही. कारण मंत्री गिरीष महाजन हे एक असे आगळे वेगळे रसायन आहे की जे सरकारचेच नाही तर सर्वसामान्यांना देखील संकंटमोचक वाटावेत अशी त्यांची एकंदर कार्यप्रणाली आहे.
त्यामुळेच यंदा देखील सलग दहा ते बारा तास वारीच्या नियोजनावर नियंत्रण ठेवित प्रशासनाला योग्य सुचना करीत,वारकऱ्यांची सुरक्षितता, पोलिसांचे मनोबल आणि यात्रेचे सुरळीत व्यवस्थापन यांना सर्वोच्च प्राधान्य देत विठुरायाचे सेवेकरी म्हणून सलग दुसऱ्या वर्षी देखील मंत्री महाजनांच्या सेवेचा येथे आषाढी यात्रेसाठी आलेल्या वारकरी भाविकांना निश्चितच प्रत्यय आला.
Post Views: 4