सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व एस. एस. फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रभवन प्रशासकीय इमारत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘महामानव चषक’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि आदर्श पालकांचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी बाबासाहेबांच्या मूर्तीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानिमित्त महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व पदाधिकारी यांच्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘महामानव चषक’ या नावाने पार पडलेल्या स्पर्धांमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉलसह विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, वकील, उद्योजक अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, अशा आदर्श माता-पित्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती अध्यक्षा रंजीता चाकोते, माजी महापौर श्रीकांचन्ना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, जंगम मॅडम, नगरसेवक बडूरवाले, नगरसेविका श्वेता खरात, कल्पना कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा स्पर्धांमध्ये एस आय टीमने प्रथम क्रमांक, शिक्षक टीमने द्वितीय तर झोन क्रमांक सातने तृतीय क्रमांक पटकावला. व्हॉलीबॉल स्पर्धेत झोन क्रमांक सातने प्रथम, तर झोन क्रमांक पाचने द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्या संघांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. ‘बेस्ट बॉलर’ म्हणून पवार तर ‘मालिकावीर’ म्हणून मनोज सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा एस एस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट, विभागीय अधिकारी तळिखेडे साहेब, आरोग्य निरीक्षक हमीद हिरोली, उत्सव अध्यक्ष बाळासाहेब गोतसुर्वे, क्रांती युनियन अध्यक्ष लिंबराज जेठीथोर, दत्ता गायकवाड, कुमार मोरे, पांडू दुपारगुडे, सागर शिरसे, आकाश मोरे, सनी बनसोडे, विष्णू तळभंडारे, सचिन आवारे, गणेश डेंगळे, श्रीनिवास रामगल, शुभम रणखांबे, मुख्य आरोग्य निरीक्षक जय कांबळे तसेच समता सैनिक दलाचे अनिल जगझाप, सुमित्रा केरबा जाधव, प्रभूलिंग पुजारी, रवी बनसोडे, राहुल बनसोडे, दादा शिंगे, सुरेखा बाळशंकर आदींचे सहकार्य लाभले. यावेळी समता सैनिक दल महार बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
























