सोलापूर : सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्था व मेलडी बिट्स कराओके यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिजधाम वृद्धाश्रमात गीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.
यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक फोफलीया, संस्थेच्या संस्थापिका प्राचार्य डॉ. मीना गायकवाड, सचिव प्रा. डॉ. डी. आर. गायकवाड, दत्ता भडकुंबे तसेच एसआरपीएफ ग्रुप क्र. १० चे अधिकारी व जवान उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. मीना गायकवाड, दत्ता भडकुंबे, श्री. भंडारे, श्रीपाल कांबळे, साक्षी देवस्थळे, संजीवनी सिदगणे, मनोज शिंदे, सारंग देवस्थळे व प्रणाली रासे यांनी हिंदी-मराठी चित्रपटगीते आणि अभंग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. बी. जगतपुरे, एन. टी. नांगरे, शरद डोंगरे, तुषार साळुंखे, किशोर सरोदे, तय्यब शेख, विष्णू बसिने यांच्यासह एसआरपीएफ ग्रुप १० चे अधिकारी व जवान उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव दुध्याल यांनी केले तर व्यंकटेश रेड्डी यांनी संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी फोफलीया यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 5