गौडगाव – परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी धाडसाने केली असून अद्यापही नद्या-नाले कोरडे आहेत.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असले तरी बार्शी तालुक्यातील गौडगांव परिसरात अत्यल्प पाऊस पडला आहे.
जेमतेम पेरणीकरिता आवश्यक ओलावा झाल्यामुळे भालगाव, गौडगाव, आळजापूर, संगमनेर, रऊळगांव, रुई व झरेगांव या गावामध्ये खरीप पेरणी झाली आहे. परंतु ही पेरणी रामभरोसे झाली आहे. या भागातील कोणत्याही नदीला अथवा पाझर तलावामध्ये एक टक्काही पाणी नाही. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. येत्या १५ दिवसात मोठा पाऊस नाही पडल्यास हातचे गेले अन् पदरचही गेले अशी भयानक स्थिती शेतकऱ्यांची होणार आहे. या भागात ऐंशी टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर मूग, ऊडीद, तूर व मका इत्यादी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.
Post Views: 6