
सोलापूर – “चॅम्पियन चषक” एचटूई पॉवर सिस्टिम्स १३ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर मुलांच्या गटात नागपूरच्या मारस सहजवीर सिंगने आठ पैकी सात गुण करून अजिंक्यपद पटकाविले. मुलींच्या गटात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त खेळाडू त्वेषा जैन हिने स्पर्धेमध्ये आठ पैकी साडेसात गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही विजेत्यांना रोख ४ हजार रुपये, आकर्षक चषक व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच तसेच मुलांच्या गटात पुण्याचा राम लथीक याने साडेसहा गुणांसह तर मुलींच्या गटात छत्रपती संभाजीनगरच्या भूमिका वाघळे हिने देखील सात गुणांसह स्पर्धेचे उपविजेतेपद प्राप्त केले.
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच हेरिटेज समूह, चॅम्प चेस स्कूल आणि नेक्स्ट मुव्ह चॅम्पियन ऑनलाइन चेस अकॅडमी यांच्या सहकार्याने सोलापूर चेस अकॅडमीतर्फे गांधीनगर येथील द हेरिटेज येथे आज उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचा बक्षीस समारंभ नवी मुंबईचे सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड, प्रमुख पंच पुण्याचे आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, फिडे मार्गदर्शक शशिकांत मक्तेदार, वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी रोहिणी तुम्मा -राठी, युवराज पोगुल, गणेश मस्कले, जयश्री कोंडा, विजय पंगुडवाले, भरत वडीशेरला, प्रज्वल कोरे, यश इंगळे, नितीन अग्रवाल, अभिजीत बावळे, नागराज वडीशेरला यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. विजेत्या खेळाडूंना रु. ३६ हजार रुपयाची रोख पारितोषिके, मेडल्स तसेच आकर्षक “चॅम्पियन चषक” देऊन गौरविण्यात आले. स्पधेतील सर्वात लहान खेळाडू सहा वर्षीय अनिरुद्ध नागरकर (पुणे), अनय कुमार व श्रीनिधी देशमुख (परभणी), श्रुती भारती यांना देखील मेडल्स प्रदान करण्यात आले.
———–
तेरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला *महाराष्ट्राचा पाच मुले व चार मुलींचा संघ:*
*मुले :-* मारस सहजवीरसिंग – ७ नागपूर, लथीक राम- ६.५ (४२) पुणे, विवान सोनी – ६.५ (४१.५) कोल्हापूर, कुशाग्र पालीवाल – ६.५ (३९.५) कोल्हापूर, अनय घुले – ६.५ (३९) मुंबई उपनगर
*मुली :-* त्वेषा जैन – ७.५ मुंबई, भूमिका वागळे – ७ छ. संभाजीनगर, प्रिशा घोलप – ६.५(३९.५) नाशिक, तिस्या पट्ट – ६.५(३४.५) ठाणे.
———-
*अंतिम निकाल याप्रमाणे:* (अनुक्रमे ६ ते १०) १३ वर्षे मुले : विहान अग्रवाल – ६.५(३८.५) मुंबई उपनगर, वरद पाटील – ६.५(३७), सांगली, निर्वाण शहा – ६.५(३६) मुंबई शहर, आरव धायगुडे – ६(४०) पुणे, सामविद पासबोला – ६(३९.५) मुंबई उपनगर. मुली: सिद्धी कर्वे – ६(३९.५) कोल्हापूर, अनुष्का देशपांडे – ६(३७.५) नागपूर, महुआ देशपांडे – ६(३३) मुंबई उपनगर, व्येघा बैजू – ६(३२.५) रायगड, सान्वी गोरे – ५.५(४१.५) सोलापूर, गिरीषा पै – ५.५(३८) मुंबई उपनगर.
११ वर्षे वयोगट मुले: शौर्य भोंडवे पुणे (६), वेदांत पुजारी मुंबई (५.५), अन्वित गायकवाड अहिल्यानगर (५.५). मुली: आदिना मोहंती – ५.५ पुणे, रीवा खुडे – ५ मुंबई, मिष्का त्रिपाठी – ५ मुंबई.
८ वर्षे वयोगट मुले: अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर (५.५), अनिरुद्ध नगरकर पुणे (४), अर्णव वाघमारे ठाणे (३.५). मुली: आरिषा वाघमारे – ३ ठाणे, श्रीनिधी देशमुख- ३ परभणी, ईशा पटवर्धन – १ सोलापूर.
उत्कृष्ट सोलापूर मुले: देवदत्त पटवर्धन (५), श्रेयस कुदळे (४.५), सिद्धांत कोठारी (४.५)
उत्कृष्ट सोलापूर (मुली): संस्कृती जाधव – ५, सिद्धी देशमुख – ४.५, अदिती इनानी – ४.






















