‘एम्पॉवरिंग मोबिलिटी, एनेबलिंग ड्रीम्स’ (वाहतुकीला बळ, स्वप्नांना दिशा) हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या वर्थ कॅपिटलची ही नवीन शाखा सोलापूर आणि परिसरातील ग्राहकांच्या वाहन कर्ज व मालमत्ता वित्तपुरवठ्याच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सोलापूर शाखेच्या कामकाजाची जबाबदारी आरबीएच श्री. चंद्रकांत पाटील, बीएच श्री. प्रवीण ढवळे आणि त्यांची अनुभवी टीम सांभाळणार आहे. या शाखेचे उद्घाटन डॉ. नंदकुमार भुतडा (संचालक, आशीर्वाद मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वर्थ कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. शिवप्रसाद भुतडा आणि मुख्य परिचालन अधिकारी (COO) श्री. बी. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट :
विविध प्रकारच्या वाहनांसाठी कर्ज सुविधा
वर्थ कॅपिटलच्या माध्यमातून ग्राहकांना कार व व्यावसायिक वाहने, ट्रॅक्टर तसेच प्रवासी वाहने आणि पिकअप वाहनांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना सुलभ सेवा देण्याच्या उद्देशाने कंपनीकडून जलद कर्जमंजुरीसह विविध आर्थिक सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे.
सोलापूरमधील नवीन शाखेमुळे परिसरातील वाहन खरेदीदार, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना वाहन वित्तपुरवठ्याच्या सुविधा अधिक सहजपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील विस्ताराच्या दृष्टीने सोलापूर शाखेची सुरुवात हा कंपनीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.






















