पंढरपूर – पंढरीचा वारकरी व हिंदुत्वाचा धारकरी मी असून याचा मला अभिमान आहे. श्री विठ्ठल मंदिराला चिटकून क्रांतिवीर वसंत दादा बडव्यांच्या पुतळ्यापाशी अशा पवित्र ठिकाणी हा पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्यच आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे लढवय्ये आमदार महेश लांडगे यांनी पंढरपुरात महाराष्ट्र प्रसिद्ध असा “क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार” स्वीकारताना काढले.
सदर पुरस्कार वारकरी संप्रदायाचे चालते बोलते विद्यापीठ असणारे गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, शंकर महाराज बडवे, रामकृष्ण महाराज वीर यांचे हस्ते व पत्रकार महेश खिस्ते, विवेक बेणारे, नगरसेवक भागवत महाजन बडवे, नगरसेवक ओंकार जोशी, नगरसेवक सौरभ थिटे, हिंदू महासभा नेते अभयसिंह इंचगावकर, यांचे प्रमुख उपस्थितीत अर्पण करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य लढा, गोवामुक्ती लढा,हैद्राबाद मुक्ती लढा,यातील सशस्त्र क्रांतिकारी वसंतदादा बडवे यांच्या ४१ व्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम होता.
देव,देश,आणी धर्मासाठी कट्टर पणे लढणार्या झुंझार हिंदू वीरांना, मोठ्या सन्मानाने हा पुरस्कार म्हणजे जणू पाटील क्रांतिवीर वसंत दादा बडवे यांचा म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग रायाचा आशीर्वाद दिला जातो. आजपर्यंत अशा अनेक मोठ्या वीरांना हा पुरस्कार दिला गेला आहे याची माहिती अभयसिंह कुलकर्णी यांनी दिली.
या वेळी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, पंढरपूरच्या कॉरिडाँर बाधितांच्या बाबतीत सुद्धा मी तुमच्यापैकीच एक समजून तुमच्या मागण्या निश्चितच शासनापुढे मांडून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन.
वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी वारकरी सांप्रदायाचे आशीर्वाद व शुभेच्छा आपल्या पाठीशी कायम राहतील असा आशीर्वाद दिला.
प्रारंभी श्री विठ्ठलाचे आशिर्वाद अनिलकाका बडवे व श्री रूक्मिणीमातेचे आशीर्वाद महेशाचार्य उत्पात यांनी दिले.महाराष्ट्र प्रदेश हिंदू महासभेचे अध्यक्ष अनिलराव पवार यांनी सुद्धा हिंदुत्वाच्या लढाईत आम्ही आपल्या सोबत आहोत असे वचन दिले. प्रचंड गर्दीत, मोठ्या उत्साहाने झालेल्या या दिमाखदार समारंभासाठी पंढरपूर हिंदू महासभेचे अध्यक्ष विकास मोरे, प्रशांत खंडागळे, संजय इनामदार, अनिल गवळी , यशवंत बेणारे, तुकाराम चिंचणीकर, दत्ताजी शिंदे इ.मान्यवरांनी परिश्रम घेतले.
————
चौकट : (हिंदूंनी एकत्र येऊन दक्ष राहावे)
भारताची परिस्थिती फ्रान्स प्रमाणे होऊ द्यायची नसेल तर हिंदूंनी एकत्र येवून दक्ष राहिले पाहिजे असे प्रतिपादन आमदार लांडगे यांनी केले.
—————
चौकट : (हा पुरस्कार म्हणजे आशीर्वाद)
क्रांतिवीर वसंत दादा बडवे प्रतिष्ठानने मला हिंदुत्व शौर्य पुरस्कार दिला ही माझ्या जीवनातील फार मोठी उपलब्धी आहे.या पुरस्काराचे निमंत्रण मला माझ्या आईच्या श्राद्ध दिवशी मिळाले. एक प्रकारे हा आईचा, विठू माऊलीचा आशीर्वाद मला मिळाला आहे. देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
—————
चौकट : (भारताचा फ्रान्स होण्याचा धोका)
सांगलीतील गरीब हिंदू पती-पत्नीची जिहाद्यांनी हत्या केल्यानंतर जे लिब्रांडू शांत बसून राहिले होते ते माझ्या प्रतिक्रियावर मात्र तुटून पडू लागले. अशा पाखंडी लोकांमुळे भारताचा फ्रान्स होण्याचा धोका निर्माण झाला आहे
Post Views: 13