अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे हे नगरसेवक म्हणुन पाचव्यांदा निवडून आले आहेत. यानिमित्ताने शिरवळ येथील श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने अजित होदलूरे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी चनमलप्पा बिराजदार, विजयकुमार बिराजदार, राजकुमार निंबाळे, संगप्पा कुडले, धनराज निंबाळे, मेजर मुकुंद दूधभाते, काशिनाथ निंबाळे, गजानन निंबाळे, सचिन पालापुरे, नागनाथ मनगुळे, चंद्रकांत होदलूरे, संगमेश्वर चानकोटे, श्रीकांत मलवे, महेश मस्कले, लखन सुरवसे, विपुल जाधव आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – शिरवळ येथील श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने नगरसेवक महेश मालक इंगळे यांचा सत्कार करताना अजित होदलूरे व अन्य दिसत आहेत.

























