Monday, April 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाशिवरात्रीला गौडगाव येथे भक्तिसागर उसळला

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in marathwada
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त ता. अक्कलकोट येथील गौडगाव बु. मधील श्री जागृत हनुमान मंदिर परिसरात रविवारी पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरात पहाटे मुख्य पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांच्या हस्ते भगवान शंकरांची विधिवत पूजा संपन्न झाली. मंत्रोच्चारांच्या निनादात आणि घंटानादाच्या मंगल ध्वनीत मंदिर परिसर शिवमय झाला होता.

महाशिवरात्री निमित्त महारुद्र अभिषेक, शिवस्तोत्र पठण, लिंगाष्टकम, होम-हवन आदी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. रुद्राच्या मंत्रांनी वातावरण भारावून गेले असून उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सहभागी होत आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली. अभिषेकासाठी दूध, दही, बेलपत्र, फुले अर्पण करून भाविकांनी मनोभावे पूजा अर्चा केली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

सोलापूर, कलबुर्गी, इंडी, अक्कलकोट, अफझलपूर, मणूर, माशाळ, आळंद, सिंदगी आदी विविध भागांतून हजारो भाविकांनी उपस्थिती लावत दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात शिस्तबद्ध रांगा लावण्यात आल्या होत्या. भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापूरे, विश्वस्त प्रकाश मेंथे, सिद्राम वाघमोडे, शांतय्या स्वामी, प्रकाश सनकळ, परमेश्वर सुतार, मल्लिनाथ म्हेत्रे, श्रीमंत म्हेत्रे, श्रीमंत सवाळतोट आदींनी विशेष परिश्रम घेतले.

स्वयंसेवकांनीही दर्शन रांग नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सुरक्षा याकडे लक्ष दिले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संगम अनुभवायला मिळाला. मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. फोटो ओळ:- श्रीक्षेत्र गौडगाव येथे जागृत हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

Post Views: 20
Previous Post

महाशिवरात्रीला गौडगाव बु. येथे भक्तिसागर उसळला

Next Post

नाट्य परिषद सोलापूर शाखेचा उपक्रम; शब्दांच्या सुरावटीतून उलगडला प्रेमयोग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नाट्य परिषद सोलापूर शाखेचा उपक्रम; शब्दांच्या सुरावटीतून उलगडला प्रेमयोग

ताज्या बातम्या

दिमाखात साजरी झाली भगवान परशुराम जयंती

April 19, 2026

युवक काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन

April 19, 2026

पद्मशाली समाजाचे सुपुत्र नागेश कोंडा यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आला

April 19, 2026

अक्षय तृतीया आहार अर्पणातून आत्मशुद्धीचा संदेश

April 19, 2026

अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणी पालकमंत्री

April 19, 2026

महिलेला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल

April 19, 2026

हर्षउल्हासात साजरा केला अक्षय तृतीया

April 19, 2026

प्रबोधनात्मक देखाव्यांनी भारवलेली मिरवणूक झाली सुरू

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0819396

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697