मोडनिंब – शेटफळ (ता. मोहोळ) येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त येथे उपसरपंच दत्तात्रय उद्धव वागज यांच्या वतीने भाविकांसाठी पाच दिवसांचे मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, जिल्हा परिषद सदस्य विजयराज डोंगरे, तसेच पीएसआय शेळके, राजेश वागज आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.उपसरपंच दत्तात्रय वागज यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील जि.प. प्राथमिक शाळा परिसरात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत महाप्रसाद दिला जात आहे.या उपक्रमासाठी हॉटेल सागर व सर्व मित्र परिवार, शेटफळ यांनी विशेष परिश्रम घेतले असून मोठ्या संख्येने भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

















