अक्कलकोट – के.एल. इ. सोसायटी संचलित मंगरूळे प्रशाला येथे पद्मश्री डॉक्टर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र टाकणे ,पोलीस उपविभागीय अधिकारी, अक्कलकोट उपस्थित होते .तसेच अध्यक्षस्थान स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य ऍड.अनिल मंगरुळे यांनी भूषविले. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते डिजिटल क्लासचे उद्घाटन करण्यात आले व नंतर वृक्षारोपण करून लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व के. एल. इ.चे पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक उमेश नेवाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संगमेश्वर निंगदळी यांनी केला व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .विद्यार्थी मनोगतामध्ये आजच्या दिनाचे महत्त्व कुमार सुरज पारगुंडे व पुतळाबाई बिराजदार यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व कन्नड मधून विशद केले. सौ. लोके व प्रा. आर.एस पाटील यांनी डॉक्टर कोरे यांच्या विषयी व त्यांनी केलेल्या सामाजिक राजकीय व शैक्षणिक कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण बसवराज मनोरे यांनी यादी वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र टाकणे यांनी आपल्या मनोगतातून के.एल. इ. चे वटवृक्ष पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांना साहित्य, राजकारण, शिक्षण व समाजसेवा यामुळेच डॉक्टर कोरे यांना पद्मश्री भूषण मिळाले आहे असे आपल्या मनोगततून सांगितले व त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रसंगी श्री नंदाजी कदम यांनी संस्थेची माहिती व विस्तार याविषयी विषयी मार्गदर्शन केले. ऍड. अनिल मंगरूळे यांनी सर्व शिक्षक वृंद यांनी केलेले उल्लेखनीय केलेल्या कामामुळेच के.एल. इ. चे रूपांतर वटवृक्षांमध्ये झाले आहे असे अध्यक्षीय भाषणामध्ये कौतुक करून अभिनंदन केले. आभार निलेश बाके यांनी तर सूत्रसंचालन विश्वजीत पाटील यांनी केले.
Post Views: 27