शुक्रवार दिनांक 21/08/2026 रोजी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेत पालक शिक्षक सभा संबोधनपर विचारांनी संपन्न झाली. यासाठी इन्स्टिट्यूटच्या सिनिअर रिजनल मॅनेजर (ठाणे, मुंबई ऑफिस) स्नेहा कामठे मॅडम या विशेष करून उपस्थित होत्या. स्नेहा कामठे मॅडम यांनी पालक शिक्षक सभेचे महत्त्व, गरज आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा सुपरिणाम यावर सर्वांना संबोधित केले. स्पर्धेच्या या काळात पाल्याच्या विकासासाठी आयोजित सभे शिवाय पालकांनी इस्टिट्यूटला येणे आणि शिक्षकांची संवाद साधणे किती आणि कसे गरजेचे आहे याचे सर्व बाजूंनी विवेचन केले. ब्रांच मॅनेजर श्री वल्लभ कुलकर्णी यांनी कोहिनूर संस्थेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून त्यांचे जडण-घडण आणि नोकरी किंवा वैयक्तिक व्यवसाय यावर सखोल माहिती दिली. त्यानंतर पालकांनी आपल्या पाल्यासोबत विविध ट्रेडच्या लॅबमध्ये जाऊन त्यांच्या शिक्षकासोबत विद्यार्थ्याची प्रगती बद्दल सविस्तर चर्चा केली.
या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.



















