Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांची ग्वाही; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन

तरुण भारतbyतरुण भारत
August 22, 2026
in solapur
0
महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांची ग्वाही; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील महत्त्वाकांक्षी व पथदर्शी गृहप्रकल्प म्हणून साकारलेल्या रे नगरच्या प्रलंबित बीजभांडवलासाठी ₹२५० कोटींची तरतूद, तसेच कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहतीतील मलनिःसारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मशानभूमी आणि विमा/ईएसआय दवाखान्यासह अत्यावश्यक नागरी व पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे ठोस व निर्णायक शिफारस करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष मा. अर्जुन खोतकर यांनी दिली.

रे नगर आणि कॉ. गोदूताई परुळेकर नगर येथील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याबाबतही आपण पुढाकार घेऊ, तसेच त्या बैठकीस स्वतः उपस्थित राहून श्रमिकांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करू, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. सोलापूर दौऱ्यात गोदूताई नगर व रे नगरची पाहणी केल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवार, दि.२१ ऑगस्ट रोजी मा. अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या वेळी कामगारांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत व यथोचित सत्कार करण्यात आला.

रे नगरचे बीजभांडवल तातडीने उपलब्ध करण्याची मागणी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे नगर फेडरेशनच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या हिश्श्यापोटी राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत उपलब्ध करून दिले जाणारे गृहकर्ज सध्या मंजूर होत नसल्यामुळे प्रकल्पाच्या पुढील कामांवर परिणाम झाला आहे.

त्यामुळे निर्धारित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने बीजभांडवलापोटी ₹२५० कोटी उपलब्ध करून द्यावेत, तसेच प्रकल्पांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या पायाभूत व नागरी सुविधांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

गोदूताई नगरातील १० हजार विडी कामगार कुटुंबांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न

मौजे कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर येथील कॉ. गोदूताई परुळेकर नगरमध्ये सुमारे १०,००० विडी कामगार कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र, अद्याप मलनिःसारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मुख्य व अंतर्गत रस्ते, स्वतंत्र स्मशानभूमी तसेच विमा/ईएसआय दवाखाना यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा प्रश्न प्रलंबित आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार सुमारे ₹२०० कोटींच्या मलनिःसारण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेस तातडीने प्रशासकीय व आर्थिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आमदार हेमंत पाटील यांनीही व्यक्त केली नाराजी

यावेळी ज्येष्ठ आमदार मा. हेमंत पाटील यांनीही वसाहतीत येताना अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी कॉ. आडम मास्तर यांच्याकडे, “माझ्यासारख्या आमदाराला येथे येताना त्रास होतो, तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील?” असा सवाल उपस्थित केला.

वसाहतीच्या मुख्य कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या प्रश्नावर तातडीने बैठक घेण्याच्या सूचना केल्या.

या वेळी कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा बल्ला, फातिमा बेग, रे नगर फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनीताई कलबुर्गी, सचिव युसुफ शेख (मेजर), ॲड.अनिल वासम,गजेंद्र दंडी यांच्यासह संस्था पदाधिकारी, संस्थेचे सर्व पूर्णवेळ कार्यकर्ते , वसीम मुल्ला, बापू साबळे, अप्पाशा चांगले, हसन शेख नरसिंग बुगले, बालाजी तुम्मा, राजेंद्र गेंट्याल  चंटी बिटला आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 56
Previous Post

आवताडे शुगरने स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या- ना.ॲड.राहुल नार्वेकर

Next Post

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

ताज्या बातम्या

बापूजी नगरातील वादग्रस्त समाजमंदिर महापालिकेने घेतले ताब्यात

September 5, 2026

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली मार्गांची पाहणी #solapurnews #news

September 5, 2026

श्रावण शुक्रवार निमित्त विठ्ठल रुक्मिणीस सुवर्ण अलंकारांनी नटविले #viral #marathinews #news

September 5, 2026

वालचंद कॉलेज समोरचे अतिक्रमण हटवले

September 5, 2026

शहर मध्यचा पूर्ण विकास करेन – आमदार कोठे #solapurnews #viral

September 5, 2026
ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165340

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!