सोलापूर : वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी कला, विज्ञान (अनुदानित) तसेच विज्ञान (स्वयंअर्थसहाय्य) विभागाची पालक-शिक्षक सभा उत्साहात पार पडली. सभेला प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, समन्वयिका सौ. सारिका महिंद्रकर, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
समन्वयक सारिका महिंद्रकर यांनी सभेत सीईटी, जेईई व नीट परीक्षांचे पुढील दोन वर्षांचे नियोजन, मागील वर्षाचा गुणवत्तापूर्ण निकाल, उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली.
उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण समन्वय आवश्यक असल्याचे सांगत, महाविद्यालयातील शिस्त, ड्रेस कोड, मोबाईल वापरावरील निर्बंध, गुणवत्तापूर्ण अध्यापन व विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.विद्यार्थ्यांची शिस्त, नियमित उपस्थिती, विषयनिहाय वर्गरचना, महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सुपर बॅच, रिमेडियल क्लासेस, ओपन हाऊस, टीएसएसएएफ योजना, सायकल बँक, आरोग्य शिबिरे, विद्यार्थिनींची सुरक्षा, पोलिस भरती प्रशिक्षण तसेच विविध सहशालेय उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली.
प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी पालकांनी महाविद्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी पालकांनी वाहतूक व्यवस्था, विद्यार्थिनींची सुरक्षा व मोबाईल वापराबाबत सूचना मांडल्या. अकरावी पालक-शिक्षक संघाच्या नवीन समितीच्या गठनासाठी पालक प्रतिनिधी होण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तुपकर व अंबिका माळी यांनी तर आभार प्रदर्शन संदीप चेंडकापूरे व तांदळे मॅडम यांनी केले. सदर पालक सभेचे सचिव श्री सुजित शिंदे व श्री प्रसाद जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सभेला स्वयंअर्थसहाय्य विभागातील २५३ तर अनुदानित विभागातील २०० हून अधिक पालक उपस्थित होते.
Post Views: 16