सोलापूर : पी. एस. इंग्लिश मीडियम टेक्निकल हायस्कूल, सोलापूर येथे *स्व. श्री. रतनचंदजी सखाराम शहा* यांच्या स्मरणार्थ विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून आंतरशालेय स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत हस्ताक्षर, चित्रकला व रंगभरण, पोस्टर मेकिंग आणि वक्तृत्व या स्पर्धांचा समावेश होता.
सोलापूर शहर व परिसरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी आपली कला, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि वक्तृत्व कौशल्याचे प्रभावी सादरीकरण केले. परीक्षकांनी सर्व स्पर्धकांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या ट्रस्टी व सी.ई.ओ मा. देवई शहा, शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, पर्यवेक्षक जयेश शिरढोणे, सर्व शिक्षकवृंद, इतर शाळेचे प्रतिनिधी व पालकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले. संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडली.
Post Views: 8