Friday, August 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘झाडे लावा, संस्कार जोपासा’; सिंहगडच्या दिंडीतून जनजागृती

तरुण भारतbyतरुण भारत
July 24, 2026
in solapur
0
‘झाडे लावा, संस्कार जोपासा’; सिंहगडच्या दिंडीतून जनजागृती
0
SHARES
696
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव, सोलापूर येथे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचा जागर करत भक्तिमय वातावरणात भव्य आणि पर्यावरणपूरक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. “ज्ञानोबा-तुकाराम”, “जय जय रामकृष्ण हरी” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या अखंड नामघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर विठ्ठलमय झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा)  अश्विनी पाटील आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती व पालखीचे पूजन करून करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले व निखहत शेख, सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक डॉ. एस. एच. पवार, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रविंद्र व्यवहारे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयाच्या रमन, कलाम, होमी आणि विक्रम या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संतपरंपरेचे आकर्षक दर्शन घडविले. भगव्या पताका, पालखी, टाळ-मृदंग, वीणा, लेझीम, फुगडी, रिंगण, अभंग आणि भारूड यांच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.
या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक मूल्यांचा संदेश देणारे विविध फलक हातात घेत जनजागृती केली. “झाडे लावा, पर्यावरण वाचवा”, “वडिलधाऱ्यांचा सन्मान करा”, “नेहमी खरे बोला”, “मोबाईलमध्ये कमी गुंतूया, मैदानी खेळ खेळूया”, “व्यसनमुक्त समाज घडवूया”, “स्त्री-सन्मान हीच खरी संस्कृती”, “स्वच्छता राखा”, “राष्ट्रीय एकात्मता जपूया” अशा घोषवाक्यांद्वारे विद्यार्थ्यांनी समाजापुढे सकारात्मक संदेश ठेवला. पर्यावरणपूरक दिंडीच्या या संकल्पनेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेतून संतपरंपरेचे जिवंत दर्शन घडविले. प्रत्येक हाऊसने वारीचे महत्त्व, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, स्त्री-सन्मान आणि भारतीय संस्कृतीचे जतन या विषयांवर आधारित देखावे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख पाहुण्या अश्विनी पाटील यांनी आपल्या मनोगतात वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक परंपरा नसून शिस्त, सेवा, समता, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा महान सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगितले. आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
पालखी मिरवणूक, रिंगण सोहळा, अभंग गायन, भारूड, हरिपाठ, सामूहिक आरती आणि प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वारकरी परंपरेचा आनंद अनुभवला.
या भव्य, भक्तिमय आणि पर्यावरणपूरक दिंडी सोहळ्याने विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख करून देतानाच भारतीय संस्कृती, पर्यावरण संवर्धन, शिस्त, समता, सेवाभाव आणि सामाजिक मूल्यांची प्रभावी शिकवण दिली.
Post Views: 869
Previous Post

माऊली प्री इंग्लिश स्कूलमध्ये विठोबा रखुमाई ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात विद्यार्थी दंग

Next Post

शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे 56 वा वाढदिवस शहरातील 56 समस्याने साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे 56 वा वाढदिवस शहरातील 56 समस्याने साजरी

शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे 56 वा वाढदिवस शहरातील 56 समस्याने साजरी

ताज्या बातम्या

व्हीजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये भरला मध्ययुगीन शस्त्र प्रदर्शनाचा सोहळा #news #marathinews

August 13, 2026

व्हीजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये भरला मध्ययुगीन शस्त्र प्रदर्शनाचा सोहळा #news #solapurnews

August 13, 2026

महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त वंदन कऱण्यात आले

August 13, 2026

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा – सुरेश पाटील

August 13, 2026

अरण येथे सावता महाराज यांच्या 731 व्या पुण्यतिथी सोहळा रंगला #viral #news #marathinews

August 13, 2026

राज्य मैदानी स्पर्धेत स्वरा जाधव लांब उडीत प्रथम #news #marathinews #aajsolapur

August 13, 2026

रेल्वे अपघातात विस्कटलेल्या तारांची पुन व्यवस्था करताना रेल्वे कर्मचारी #viral #marathinews #news

August 13, 2026

गृहमंत्री अमित शहा यांनी दिले सणसणीत उत्तर….

August 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1059510

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!