बार्शी – येथील दत्तनगरमधील माऊली प्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आषाढी एकादशीनिमित्त पालखी दिंडी सोहळा संपन्न झाला. विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानदेव, मुक्ताई, तुकाराम, वारकरी इत्यादी वेशभूषा परिधान करुन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाळ, मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा तुकाराम’ जयघोषात विद्यार्थी पाऊल आणि फुगडी खेळले. गजानन महिला भजनी मंडळ यांनी दिंडीमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांच्या सौभाग्यवती कविताताई राऊत यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. संस्थापक अध्यक्ष विजयसिंह पाटील, सचिव अर्चना पाटील तसेच सर्व शिक्षकांनी याकामी परिश्रम घेतले.
Post Views: 10