सोलापूर दि. 25 (जिमाका) -: महाराष्ट्र लोकसेवा आयोग, यांचेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHA TET) परीक्षा – 2026 ही दि. 28 जून 2026 रोजी सकाळी 10 वा. ते 17 वा. या वेळेत सोलापूर शहरातील खाली नमुद 47 परीक्षा उपकेंद्रांवर होणार आहे.
सदर परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स सेंटर, फॅक्स, ईमेल, रेडिओ, इंटरनेट अशा दळणवळण सुविधा यांचा परीक्षेच्या अनुषंगाने गैरवापर होण्याची शक्यता आहे, अशा सुविधा कार्यरत ठेवणे, वायरलेस सेट, ट्रांझिटर, मोबाईल फोन, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, संगणक गणनायंत्र (कॅल्क्युलेटर), ई-मेल, इंटरनेट, झेरॉक्स सेंटर यासारख्या दळणवळण साधनांचा परीक्षा केंद्राच्या आवारात उपयोग केला जातो. तसेच परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत नसलेली व्यक्तीं परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश करणे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे, परीक्षार्थीना कोणताही अडथळा होऊ नये आणि परीक्षा प्रक्रियेशी संबधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे परीक्षेशी संबंधित कर्तव्ये चोखपणे, कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावे म्हणून परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परीसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 चा आदेश लागू करणे निकडीचे असल्याने पोलीस उप आयुक्त, (गुन्हे/विशा), डॉ. अश्विनी पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये आदेश दिला की, दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 07.30 वा. ते दुपारी 18.00 वा. पर्यंत पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीचे कार्यक्षेत्रातील खाली नमुद सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात खालील कृती करण्यास बंदी घालत आहे.
- परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे.
- परीक्षा केंद्राच्या परिसरात सार्वजनिक शांततेसं बाधा निर्माण होईल असे कृत्य करणे.
- परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरातील झेरॉक्स, फॅक्स सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे अशा दळणवळण सुविधा आणि पानपट्टी कार्यरत ठेवणे.
- परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, सेल्युलर फोन, वायरलेस सेट, ट्रान्झीटर व इतर माध्यमासह प्रवेश करणे.
- परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणत्याही वाहनांस प्रवेश करणे.
- परीक्षा प्रक्रियेशी संबंधित नसलेली व्यक्ती (उमेदवारांचे नातेवाईकासह) परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात प्रवेश करणे.
- परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणे इत्यादी.
सदरचा आदेश परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद परीक्षार्थी पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना त्यांचे परीक्षेसंबंधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही हा आदेश दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 18.00 वाजेपर्यंत खालील परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात लागू राहील या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्यायसंहिता विषय 23 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे आदेश पोलीस उपयुक्त डॉ. अश्विनी पाटील सोलापूर शहर यांनी दिले आहेत.
परीक्षा केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे आहेत.
फौजदार चावडी परिसरात येणाऱ्या शाळांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर. ज. रा. चंडक प्रशाला, ज्युनिअर कॉलेज बाळे, सोलापूर. श्री. दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज बाळीवेस, सोलापूर. श्री. सिद्धेश्वर बॉईज हायस्कूल, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर. सुरजाबाई रामलाल गर्ल हायस्कूल सेवासदन मोरारजी पेठ सरस्वती चौक सोलापूर. संभाजीराव शिंदे प्रशाला मुरारजी पेठ, सोलापूर. श्री. सिद्धेश्वर गर्ल्स हायस्कूल सिद्धेश्वर पेठ, सोलापूर. छत्रपती शिवाजी प्रशाला, 101 ब मोरारजी पेठ, सोलापूर. शरदचंद्र पवार प्रशाला, जुना पुना नाका, मोरारजी पेठ, सोलापूर. रावजी सखाराम हायस्कूल, बुधवार पेठ सम्राट चौक, सोलापूर. राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल जुनी मिल कंपाऊंड, सोलापूर. एस. आर. चंडक इंग्लिश हायस्कूल बुधवार पेठ, सोलापूर. सखुबाई हिराचंद नेमचंद प्रशाला ,गणपती घाट दत्त चौक, सोलापूर. MIT विश्वशांती गुरुकुल स्कूल होंडा शोरूम च्या पाठीमागे, सोलापूर.
जेलरोड पोलीस ठाणे परिसरात केंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
एस. एस. ए. उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर. स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल अशोक चौक, सोलापूर. वालचंद कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स, अशोक चौक, सोलापूर. कुचन हायस्कूल 272, रविवार पेठ, सोलापूर. सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट अँड कॉमर्स कॉलेज सिद्धेश्वर पेठ, सोलापूर. बेगम कमरुनिसा कारीगर गर्ल्स हायस्कूल सिद्धेश्वर पेठ, सोलापूर. एम. ए. पानगल हायस्कूल 141 सिद्धेश्वर पेठ, सोलापूर. सौ. बी. म. कन्या प्रशाला साखर पेठ, सोलापूर. संगमेश्वर पब्लिक स्कूल सात रस्ता, सोलापूर. हरिभाई देवकरण प्रशाला व मैदान समोर, सोलापूर.
सदर बाजार पोलीस ठाणे परिसरातील परीक्षा केंद्राचे नावे पुढीलप्रमाणे आहेत.
संगमेश्वर महाविद्यालय 165 रेल्वे लाईन, सोलापूर. एस. टी. जोसेफ हायस्कूल 45 रेल्वे लाईन, सोलापूर. द प्रोग्रेशिव एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूल साउथ सदर बाजार, सोलापूर. मॉडर्न हायस्कूल गांधीनगर, सोलापूर. चंद्रभागाबाई येलगुरवार प्रशाला सिविल लाईन विकास नगर, सोलापूर. आदर्श कन्या विद्यालय रेल्वे लाईन मोदी, सोलापूर. श्री. वसंतराव नाईक हायस्कूल नॉर्थ सदर बाजार, सोलापूर. बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल, उजनी कॉलनी कुमठा नाका, सोलापूर.
एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरातील परीक्षा केंद्राची नावे पुढीलप्रमाणे आहेत
एस. व्ही. सी. एस. हायस्कूल एमआयडीसी अक्कलकोट रोड, सोलापूर. नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल, नीलम श्रमजीवी नगर, आकाशवाणी केंद्र रोड, एमआयडीसी, सोलापूर. व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम. वज्रेश्वरी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर. श्री. दत्त प्रशाला चौपाड श्रीशैल नगर, एमआयडीसी अक्कलकोट रोड, सोलापूर. श्री. न. फु. शहा – कोठारी प्रशाला शिवगंगा नगर – 5, सोलापूर.
जोडभावी पेठ परिसरातील केंद्रांची नावे
एस. व्ही. सी. एस. हायस्कूल भवानी पेठ, सोलापूर. अण्णाप्पा काडादी हायस्कूल भवानी पेठ, सोलापूर. श्री. सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम स्कूल 910, भवानी पेठ, सोलापूर. उमाबाई श्राविका हायस्कूल 197, बुधवार पेठ, सोलापूर.
विजापूर नाका परिसरातील केंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
पोद्दार इंटरनॅशनल हायस्कूल, राजस्व नगर, विजापूर रोड, सोलापूर. जागृती विद्यामंदिर नेहरूनगर विजापूर रोड, सोलापूर. भारतीय विद्यापीठ माध्यमिक विद्यालय विजापूर रोड, जुळे सोलापूर. विलास चंद्र मोतीचंद्र मेहता हायस्कूल विशाल नगर, जुळे सोलापूर. युनिक इंग्लिश मीडियम स्कूल कॉलेज ऑफ फार्मसी कॅम्पस, सोलापूर.

















