——————————
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी शहरातील नूतन विद्यालय ज्युनियर कॉलेज येथिल प्राचार्य प्राध्यापक , शिक्षक यांचा गौरवपुर्व सेवापुर्ती सोहळा संचालक कैलास देशमुख गोरठेकर यांच्या उपस्थित पार पडला आहे .
नूतन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक(MCVC) विद्यालय हायस्कूल, उमरी येथील प्राचार्य बी. वाय. पवित्रे , सहशिक्षक व्ही. एन. सोळंके व बी.डी. लोहगावे या शिक्षकांचा सेवापूर्ती गौरव समारंभ दि २९ जुन २०२४ रोजी नूतन विद्यालय ज्यु कॉलेज येथे पार पडला आहे . नियत वयामानानुसार नुतन शाळा – कॉलेजवर ३० तर कोणी ३७ वर्ष सेवा करून उत्कृष्ट आर्दश शिक्षक म्हणून कार्य केलाचा या तिमृती प्राचार्य प्राध्यापक शिक्षक यांचा इतिहास आहे . सेवापुर्ती शिक्षकांचा सह पत्नी थाटात सत्कार करून निरोप देण्यात आला आहे .
प्राचार्य बापूराव पवित्रे हे हिंदी विषयाचे प्राध्यापक होते . ते राजकीय क्षेत्रात शिक्षण सभापती म्हणून ही जिल्हा परिषद मध्ये दबंग सभापती म्हणून कै बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष / उपाध्यक्ष असतांना दबदबा निर्माण केला होता .
शिक्षक बी.डी . लोहगावे हे गणित आणि विज्ञान मध्ये पारगंत होते अध्यापनात उत्कृष्ट शिक्षक होते .
तर नुतन विद्यालय येथिल प्राथमिक शिक्षक व्ही एन सोळंके हे गणीत , मराठी , विज्ञान विषय गुणवंत शिक्षक होते त्या बरोबर ते संभाषनाचे सभेचे उत्कृष्ट वकृत्क संचालन प्रवक्ता करणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती .
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जी. बी. गाढे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नूतन विद्यालय सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांनी होते यावेळी कैलास गोरठेकर म्हणाले की सेवानिवृत्ती म्हणजे सृजनवेध करण्यासाठी वेळच वेळ.
मी सुद्धा नूतन विद्यालयाचा विद्यार्थी होतो चांगल्या शिक्षकांच्या अंगी जे असणं आवश्यक होत तेच शिक्षक मला लाभले ते मी माझ भाग्य समजतो. सेवानिवृत्त झाले म्हणजे शाळेचा संस्थेचा संबंध संपलाअसे नाही. आपले ऋणानुबंध कायम राहतील असे आहे प्रतिपादन गोरठेकर यांनी केले आहे . त्या नतंर सत्कारमूर्ती प्राचार्य बी. वाय. पवित्रे , शिक्षक व्हि.एन. सोळंके आणि शिक्षक बी.डी. लोहगावे यांनी आपल्या कार्यकतृत्वाची गाथा प्रगट करताना आमची गोरठेकर घरण्याशी नाळ जोडली आहे.
त्यांच्या ऋणात कायम राहू अशी अंत:करणातुन भावना व्यक्त केले. आणि अध्यक्ष समारोप झाले करण्यात आला .
या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिक्षक एस. एल. चोपडे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य एस. एल. शिंदे , उपमुख्याध्यापक एस. बी. सुरळीकर, पर्यवेक्षक व्ही. डी. देशमुख , व्ही. एल. शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व नूतन विद्यालयातील संपूर्ण स्टॉप यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे आभार एन. एल. लखमोड यांनी केले.