सांगोला – ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध दि.१२ मे रोजी स.११ वा. सांगोला-पंढरपूर हायवेवर बिलेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नगरसेवक सतीश सावंत यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सांगोला ग्रामीण रुग्णालयात प्रचंड प्रमाणात रुग्णांची लूट सुरू असून, रुग्णांना सेवा दिल्या जात नाहीत. तसेच मयत झालेल्यांच्या शवविच्छेदनासाठी व रिपोर्ट देण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे. याशिवाय शवविच्छेदन रिपोर्ट दिले जात नाहीत.
सांगोल्यात आपण मरावे का नको, असा प्रश्न जिवंतपणी नागरिकांना पडायला लागला आहे; कारण मेल्यानंतरही पैशासाठी नातेवाईकांची अडवणूक होत आहे. तरी याबाबत चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.


























