अक्कलकोट : मुंबई वरळी येथील मुंबई पोलिसांचा राजा वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सत्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, नातू कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक, सुंदर प्रतिमा व (धातूशिलप) प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रसिद्ध चित्रपट निर्माते – महेश मांजरेकर, सिनेअभिनेते – ईशा कुपेकर हे उपस्थित होते.
दरम्यान उभयतांच्या हस्ते श्रींची महापूजा संपन्न झाली. यावेळी मंडळाच्या वतीने वरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनिल अहिर, श्रीकांत इंगळे, मनोज गंगावणे, योगेश वाघमारे, अभिषेक कोंडविलकर, समीर कदम अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त संतोष भोसले, रोहित खोबरे, शिवराज स्वामी, सर्फराज शेख, प्रशांत साठे, श्रीशैल कुंभार, महांतेश स्वामी, किरण मोरे, गोकुळ पाटील, शुभम इंगळे, कुणाल भालेकर, संतोष माने आदिजण उपस्थित होते.
Post Views: 6