माढा : कुर्डवाडी सोलापूर रेल्वे मार्गातील माढा – वैराग रोडवरील रेल्वे गेट नं ४२ बुधवार दिनांक ५ ऑगस्ट२०२६ सकाळी ०८ वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक ७ ऑगस्ट२०२६ सकाळी ०८ वाजेपर्यंत तात्पुरत्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे. माढा वैराग मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना तसेच वाहनांना वाहतूक करण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था माढा – बार्शी राज्य राज्यमार्गवरील रेल्वे गेट नं ४० तसेच माढा महातपूर मार्गावरील रेल्वे भुयारी मार्ग (रेल्वे किमी ३९०/०-१) येथून करण्यात आली आहे.
माढा वैराग मार्गावरील रेल्वे गेट नंबर ४० येथे रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामासाठी सदर कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे. सदर काम पूर्ण होईपर्यंत या मार्गाचे वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा. रेल्वे प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील माहिती माढा नगरपंचायत, माढा बस स्थानक, माढा तहसील कार्यालय व माढा पोलीस स्टेशन यांना पत्राद्वारे कळवण्यात आली आहे.
तरी पर्यायी मार्गांचा वापर करून नागरिकांनी सहकार्य करावे असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 6