पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे मतदार यादयांचे संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत यादीचे वाचन करण्यासाठी मंडल अधिकारी विजय एकतपुरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामविकास अधिकारी भंडलकर उपस्थित होते.तसेच पिलीव येथील 211 ते 215 पर्यंतच्या सर्व मतदार यादीतील दुबार, मयत, स्थलांतरित मतदारांच्या नावांचे वाचन करण्यात आले. यावेळेस मंडला धिकारी यांनी पिलीव गावातील एकही मतदार वंचीत राहु नये यासाठी सर्वानी सात तारखेपर्यंत सर्व कामे पुर्ण करावीत .यावेळेस माळशिरस माळशिरस तालुका मंडल अध्यक्ष नितीन मोहीते, भाजपचे शहराध्यक्ष प्रमोद भैस, अतुल नष्टे, संजय पाटील, दामोदर लोखंडे, विनोद लोखंडे, समशेरसिंग रजपूत, तलाठी खाडे, बि एल ओ गोरवे सर, चौरे सर, घोळ सर, कोल्हे सर, धसाडे तर, सोमनाथ देशमुख, अण्णा कोपनर, सर्व आशा सेवीका, अंगणवाडी सेवीका यांच्यासह अनेक मान्यवर या ग्रामसभेस मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी भंडलकर यांनी आभार मानले.फोटो_ पिलीव येथील ग्रामसभेस मार्गदर्शन करताना मंडल अधिकारी विजय एकतपुरे.























