Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रेशीम कोष वाहतुकीतून रेल्वेला मिळाला नवीन महसूल स्रोत

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in railway
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – रेशीम कोष वाहतुकीतून रेल्वे विभागाने या नवीन सुविधेचा तात्काळ फायदा घेत, पंढरपूरमधील एका शेतकरी गटाने पहिल्याच दिवशी १,५०० किलो वजनाचे ३८ पोते रेशीम कोष बुक केले. यामुळे रेल्वेला एक नवीन महसूल स्रोत मिळाला, तसेच शेतकऱ्यांना प्रति किलो ५ रुपयांपेक्षा कमी किमतीत अत्यंत किफायतशीर वाहतूक पर्याय उपलब्ध झाला. रेल्वे आधारित वाहतूक ३०% पेक्षा जास्त स्वस्त तसेच रस्ते किंवा इतर वाहतुकीपेक्षा खूप वेगवान व सुरक्षित अशी आहे.

शेतकऱ्यांना किफायतशीर, थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनानुसार, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपूरहुन आशियातील सर्वात मोठी रेशीम कोकून बाजारपेठ असणाऱ्या कर्नाटकातील रामनगरम येथे, थेट रेशीम कोष वाहतूक सुरू करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

या नवीन सेवेमुळे आता पंढरपूर, सोलापूर आणि कलबुरगि ते रामनगरम पर्यंत रेशीम कोकूनची परवडणारी, एंड-टू-एंड वाहतूक शक्य होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल आणि लॉजिस्टिक्स खर्चात लक्षणीय घट होईल. शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा संकल्प करणाऱ्या समर्पित व्यवसाय विकास युनिट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित आहे.

कर्नाटकातील बेंगळुरू जवळील रामनगरम हे आशियातील सर्वात मोठे रेशीम कोष व्यापार केंद्र आहे. सोलापूर विभाग आधीच रामनगरमला ट्रेन क्रमांक १६५३६ पंढरपूर-म्हैसूर गोल गुंबज एक्सप्रेस आणि १७३०८ बागलकोट-म्हैसूर बसवा एक्सप्रेसने जोडलेला असला तरी, रामनगर येथे पाच मिनिटापेक्षा कमी वेळेचा थांबा असल्यामुळे सिल्क कोकन्स लवकर बुक करता आले नाहीत.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी व शेतकऱ्यांना लॉजिस्टिक सहाय्य प्रदान करण्यासाठी, मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. मध्य रेल्वेने लोडिंगचे काम केले तर दक्षिण पश्चिम रेल्वे ने अनलोडिंगचे काम केले, या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच रेशीम कोष थेट बुकिंग शक्य झाले.

मध्य रेल्वेचा सोलापूर विभागाने रेशीम कोकून (रेशीम कोष) उत्पादक शेतकऱ्यांनी दैनंदिन रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे.


सोलापूर रेल्वे विभागातून अश्या आहेत धावणाऱ्या गाड्या
– १६५३६ गोल गुंबज एक्सप्रेस ही पंढरपूरहून दुपारी २:०० वाजता आणि सोलापूरहून दुपारी ३:३० वाजता रामनगरमकडे निघणारी दररोजची रेल्वे सेवा आहे.
– १७३०८ बसवा एक्स्प्रेस ही सोलापूरहून १९:३० वाजता आणि कलबुर्गीहून २१:१५ वाजता रामनगरमकडे जाणारी दैनिक रेल्वे सेवा आहे.

Post Views: 120
Previous Post

नाशिक येथील वृक्षतोडीच्या विरोधात वृक्ष संवर्धन समितीचे निवेदन

Next Post

सोलापूर विद्यापीठातील संकुलांची शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकन जाहीर!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर विद्यापीठातील संकुलांची शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकन जाहीर!

ताज्या बातम्या

इंद्रायणीला महापूर वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन #viral #maharashtranews #news

July 6, 2026

मंद गतीने चालणाऱ्या कामाचा निषेध केला हटके स्टाईलने #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

B2 च्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

अबब त्या चोराला पकडायला 200 सीसीटीव्ही तपासले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

बटगिरी कारखानाला आग दोन महिलांना वाचवले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

कुंभारी एमआयडीसीच्या प्रस्तावाला उद्योगच्या समितीचा हिरवा कंदील #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका #viral #maharashtranews #marathinews

July 6, 2026

निराळे वस्ती मनोहर झोपडपट्टी अतिक्रमण हटविले….. #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0962157

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!