
सदर निवड संस्थापक अध्यक्ष मा. भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
नाशिक जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोअर कमिटी सदस्य जयदीप भदाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.युवा वर्गाला संघटित करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटना विस्ताराला गती देणे तसेच शेतकरी हितासाठी कार्य करणे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
























