या संदर्भात आयुष्मान आरोग्य मंदिर क्र. २, भवानी पेठ, बार्शी यांच्याकडून अधिकृत नोटीस देण्यात आली आहे. जन आरोग्य समितीची सन २०२६-२७ मधील पहिली सभा आयुष्मान आरोग्य मंदिर क्र. १, जवाहर हॉस्पिटललगत, बार्शी येथे आयोजित करण्यात आली आहे.
जन आरोग्य समितीच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा, औषधांची उपलब्धता, आरोग्य केंद्रातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या तक्रारी, स्वच्छता तसेच आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत चर्चा व आवश्यक कार्यवाही केली जाते.
पदसिद्ध सदस्य म्हणून राकेश नवगिरे हे नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या समितीसमोर मांडून आरोग्य सेवा अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख करण्यासाठी योगदान देणार आहेत.
त्यांच्या या समावेशाबद्दल विविध क्षेत्रातील नागरिकांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.





















