बार्शी – जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून प्रेम, स्नेह, आपुलकी आणि बंधुभावाचा संदेश दिला. भारतीय संस्कृती व संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः आकर्षक राख्या तयार केल्या. जास्तीत जास्त इको फ्रेंडली राख्या तयार केल्यामुळे राख्यांना आकर्षकता आली होती. या राखी मेकिंग उपक्रमाचे परीक्षण सचिवा वर्षाताई घाडगे आणि रेश्मा गव्हाणे यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावंडांना राख्या बांधून नात्यांमधील प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त केला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिवा वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम आणि फिजिकल कोच जे. बी. शिंदे मेजर यांची उपस्थिती होती. तसेच समाधान कदम मेजर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेम, बंधुभाव, नात्यांची जपणूक आणि भारतीय संस्कारांचे महत्त्व अनुभवता आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका माळी आणि पारस कांबळे यांनी केले.